‘लक्ष्मी’च्या हल्ल्यात केअरटेकर जखमी

By Admin | Published: June 30, 2016 01:04 AM2016-06-30T01:04:04+5:302016-06-30T01:28:18+5:30

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील हत्ती ‘लक्ष्मी’ हिने मंगळवारी सायंकाळी आपली दिवस-रात्र काळजी घेणारे केअरटेकर भागीनाथ बाळू म्हस्के यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला

Caretaker injured in Lakshmi's attack | ‘लक्ष्मी’च्या हल्ल्यात केअरटेकर जखमी

‘लक्ष्मी’च्या हल्ल्यात केअरटेकर जखमी

googlenewsNext


औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील हत्ती ‘लक्ष्मी’ हिने मंगळवारी सायंकाळी आपली दिवस-रात्र काळजी घेणारे केअरटेकर भागीनाथ बाळू म्हस्के यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात म्हस्के गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तास काम बंद आंदोलन केले.
महापालिकेने १९९५ मध्ये म्हैसूर वन विभागाकडून हत्तीची एक जोडी औरंगाबादेत आणली होती. शंकर आणि सरस्वती असे या जोडीचे नाव ठेवण्यात आले. शंकर अलीकडेच वृद्धापकाळाने सिद्धार्थ उद्यानात मरण पावला. सरस्वती आजही ठणठणीत आहे. सरस्वतीचे वय ५० वर्षे आहे. शंकर आणि सरस्वती या जोडीने १९९७ मध्ये लक्ष्मीला जन्म दिला. सध्या लक्ष्मी १९ वर्षांची आहे. मागील अनेक वर्षांपासून सरस्वती व लक्ष्मी प्राणिसंग्रहालयात आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २००७ मध्ये औरंगाबादेतील हत्ती विशाखापट्टणम येथील जंगलात सोडावे, असे आदेश दिले आहेत. मागील ९ वर्षांमध्ये हत्ती नेण्यासाठी कोणीच आले नाही. नैसर्गिक पद्धतीने सरस्वती आणि लक्ष्मीला खेळता बागडता येत नाही.
मंगळवारी सायंकाळी ‘लक्ष्मी’आपल्या परिसरात खेळत होती. केअरटेकर भागीनाथ म्हस्के तिला जेवण आणि पाणी देण्यासाठी आत गेले. अचानक लक्ष्मीने त्यांच्यावर हल्ला चढविला. तिच्या एका फटक्यात म्हस्के दूर फेकल्या गेले. थोडा वेळ ते बेशुद्ध झाले. आजूबाजूला कोणीच नव्हते. शुद्धीवर आल्यावर म्हस्के यांनाही क्षणभर विश्वास बसला नाही. मागील १९ वर्षांपासून आपल्या मुलीप्रमाणे लक्ष्मीचा सांभाळ केला असतानाही तिने आपल्यावर का हल्ला केला हे कळत नव्हते. जखमी अवस्थेत म्हस्के तसेच सरकत सरकत एका बाजूला गेले. सुदैवाने लक्ष्मीने त्यांच्यावर आणखी हल्ला चढविला नाही.
म्हस्के बराच वेळ झाले आले नाही म्हणून इतर कर्मचारी हत्तीच्या पिंजऱ्याकडे गेले. तेथे म्हस्के निपचित पडले होते. त्यांनी हाताने आपल्या सहकाऱ्यांना इशारा करून बोलावले. उद्यान अधीक्षक विजय पाटील व इतर कर्मचारी त्यांच्या मदतीला धावून गेले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना त्वरित घाटी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या डोक्याला ८ टाके (पान २ वर)

Web Title: Caretaker injured in Lakshmi's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.