वाहकांचे हक्काचे पैसे ‘एसटी’च्या तिजोरीत
By Admin | Published: May 24, 2016 12:12 AM2016-05-24T00:12:02+5:302016-05-24T01:21:00+5:30
औरंगाबाद : एस. टी. साठी दिवस-रात्र एक करून काम करणाऱ्या वाहकांचे हक्काचे पैसे ‘एसटी’च्या तिजोरीत जमा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
औरंगाबाद : एस. टी. साठी दिवस-रात्र एक करून काम करणाऱ्या वाहकांचे हक्काचे पैसे ‘एसटी’च्या तिजोरीत जमा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अतिकालिक भत्ता, किलोमीटर कमी टाकले जात आहेत. कामाचा मोबदला कमी मिळत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
नियमितपणे काम करूनही पुरेसा मोबदला मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. कर्तव्यावर जाऊन आल्यानंतर संबंधित मार्गाचे कि. मी. अंतर हे कमी टाकण्याचा प्रकार होत आहे. शिवाय विविध मार्गांवर कर्तव्य केल्यानंतर ओव्हरटाईमदेखील कमी अधिक प्रमाणात टाकण्यात येत आहे.या प्रकारासंदर्भात वाहकाकडून तक्रार करण्यात आली आहे. चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली. कर्मचाऱ्यास योग्य मोबदला देण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून होत आहे; परंतु एखाद्या कर्मचाऱ्यास मोबदला दिला तर इतर सर्व कर्मचाऱ्यांना फरक द्यावा लागणार आहे, त्यामुळेच अधिकारी घूमजाव करीत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून होत आहे.