३० हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी फौजदारासह खाजगी व्यक्ती जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:51 PM2019-07-03T23:51:03+5:302019-07-03T23:52:24+5:30

गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एकाकडून खाजगी व्यक्तीमार्फत ३० हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यातील फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. याविषयी गंगापूर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

In the case of a bribe of 30 thousand rupees, a private person is trapped with a faujdar | ३० हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी फौजदारासह खाजगी व्यक्ती जाळ्यात

३० हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी फौजदारासह खाजगी व्यक्ती जाळ्यात

googlenewsNext
ठळक मुद्देगंगापूर येथे सापळा रचून कारवाई : तक्रारदाराला गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी घेतली लाच

औरंगाबाद : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एकाकडून खाजगी व्यक्तीमार्फत ३० हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यातील फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. याविषयी गंगापूर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
फौजदार गजेंद्र तुळशीराम इंगळे आणि खाजगी व्यक्ती समीर नासीर पठाण (२९, रा. मन्सुरी कॉलनी, गंगापूर), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गंगापूर पोलीस ठाण्यात कार्यरत फौजदार इंगळे यांनी एका प्रकरणात चौकशीसाठी तक्रारदारला २८ जून रोजी ठाण्यात बोलावले होते. तक्रारदार ठाण्यात गेले तेव्हा त्यांनी संबंधित प्रकरणात आरोपी न करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराला ३० हजार रुपये लाच मागितली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी इंगळेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार ३ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन सरकारी पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा फौजदार इंगळे यांनी तक्रारदाराकडे पुन्हा लाचेची रक्कम मागून ही रक्कम समीर पठाणकडे देण्याचे सांगितले. तेथे उपस्थित असलेल्या पठाणने लाचेची रक्कम घेण्याची तयारी दर्शविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या साध्या वेशातील अधिकारी, कर्मचाºयांनी पोलीस ठाण्याजवळील न्यू जनता हॉटेलसमोर सापळा रचला. फौजदार इंगळे यांनी सांगितल्यानुसार समीर तेथे आला आणि त्याने लाचेचे ३० हजार रुपये तक्रारदाराकडून घेतले. समीरने लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला लाचेच्या रकमेसह पकडले. यानंतर लगेच गंगापूर ठाण्यातून फौजदार इंगळे यांनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे, उपअधीक्षक सुजय घाटगे, कर्मचारी संदीप आव्हाळे, भीमराज जिवडे, अश्वलिंग होनराव, संतोष जोशी यांनी केली.

Web Title: In the case of a bribe of 30 thousand rupees, a private person is trapped with a faujdar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.