मनपाकडून १२५ जणांवर 'चेक बाऊन्स'च्या केसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:05 AM2021-07-02T04:05:42+5:302021-07-02T04:05:42+5:30
औरंगाबाद : महापालिकेकडे मालमत्ता करापोटी भरणा झालेले ५१४ चेक बाऊन्स झाले असून, १२५ विरोधात 'चेक बाऊन्स'च्या केसेस मनपाने दाखल ...
औरंगाबाद : महापालिकेकडे मालमत्ता करापोटी भरणा झालेले ५१४ चेक बाऊन्स झाले असून, १२५ विरोधात 'चेक बाऊन्स'च्या केसेस मनपाने दाखल केल्या आहेत. शहरात विविध करांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून, दोन वर्षांपासून पालिका प्रशासन कर वसुलीवर भर देत आहे. पालिकेला मिळकतधारकांनी रोखऐवजी चेक देऊन वेळ मारून नेली. बँक खात्यात पुरेशी रक्कम नसणे, अक्षरी रक्कम वेगळी व अंकातील रक्कम वेगळी, तारखेत चुका असणे, नॉन सीएसटीचे चेक देणे, शाई बदल असणे, चेकवर सही नसणे आदी कारणांनी बाऊन्स होण्याचे प्रकार होतात. जानेवारीत ११३, फेब्रुवारीत १०२, मार्चमध्ये १२०, एप्रिलमध्ये १२१, मे ३६, जून २२ असे ५१४ चेक बाऊन्स झाले. २ कोटी ४६ लाख रकमेचे ते चेक होते. त्या सर्वांना नोटीस दिल्या होत्या. त्यातील ३८९ जणांनी दंडासह रक्कम भरली. उर्वरित १२५ जणांविरोधात चेक बाऊन्सच्या केसेस दाखल केल्या आहेत.
११ वाहनांना जामर लावले
औरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ११ चारचाकी वाहनांना जामर लावण्यात येऊन दंडात्मक कारवाई केली. तसेच एका वाहनाला क्रेनने गरवारे स्टेडियमवर जमा करण्यात आले. मनपा अतिक्रमण व शहर वाहतूक पोलीस विभागाने संयुक्त गुरुवारी ही मोहीम राबविण्यात आली.
क्ले मॉडेल पुतळ्याची होणार पाहणी
औरंगाबाद : शहरातील क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे क्ले मॉडेल तयार करण्यात आले आहे. शुक्रवारी २ जुलै रोजी महापालिकेचे पथक पुण्यातील धायरी येथे असलेल्या स्टुडिओमध्ये क्ले मॉडेलची पाहणीसाठी जाणार आहे. २१ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा, क्रांती चौकात उभारला जाणार आहे.