औरंगाबादमध्ये नोकरीचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार; पोलीस उपायुक्तांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:18 PM2018-06-27T12:18:50+5:302018-06-27T12:26:21+5:30
पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या विरोधात एका २२ वर्षीय मुलीने बलात्काराची तक्रार दिली. यावरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री श्रीरामे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
औरंगाबाद : पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या विरोधात एका २२ वर्षीय मुलीने बलात्काराची तक्रार दिली. यावरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री श्रीरामे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलिस कॉन्स्टेबल महिलेच्या २२ वर्षीय मुलीला नोकरीचेआमिष दाखवत उपायुक्त राहुल श्रीरामे (परिमंडळ 2) यांनी घरी बोलावून बलात्कार केला. अशी तक्रार काही दिवसांपूर्वी या मुलीने केली होती. यानंतर श्रीरामे रजेवर होते. मुलीच्या तक्रारी वरून काल मध्यरात्री एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास डीसीपी विनायक ढाकणे करत आहेत.