क्रांतीचौकात विनापरवानगी मोर्चा; ऑल इंडिया पॅंथर्स सेनेच्या २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

By योगेश पायघन | Published: October 1, 2022 04:26 PM2022-10-01T16:26:54+5:302022-10-01T16:29:28+5:30

ऑल इंडिया पॅंथर्स सेनेस भडकलगेट ते विभागीय आयुक्त या मार्गावर मोर्चा काढण्याची परवानगी शहर पोलीसांनी दिली होती.

Case registered against 250 protesters of All India Panthers Sena | क्रांतीचौकात विनापरवानगी मोर्चा; ऑल इंडिया पॅंथर्स सेनेच्या २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

क्रांतीचौकात विनापरवानगी मोर्चा; ऑल इंडिया पॅंथर्स सेनेच्या २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

औरंगाबाद : रहदारीच्या मार्गावर २०० ते २५० कार्यकर्ते जमवून क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालय मोर्चा काढून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा १३ जणांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ऑल इंडिया पॅंथर्स सेनेचे बंदी सदाशिवे यांना भडकलगेट ते विभागीय आयुक्त या मार्गावर मोर्चा काढण्याची परवानगी शहर पोलीसांनी दिली होती. मात्र, त्या मार्गावर मोर्चा न काढता विनापरवानगी ३० सप्टेंबर रोजी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. याप्रकरणी ऑल इंडिया पॅथर्स सेनेच्या २५० जणांवर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दिपक केदार, बंटी सदाशिवे, अमोल शेजवळ, शुभम मगरे, भिमराव गोटे, अजय ठेंबरे, देविसिंग भालेराव, सचिन तिवारी, निवृत्ती वाघमारे, संदीप नाथभजन, राहुल मकासरे यांच्यासह २०० ते २५० जणांवर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Web Title: Case registered against 250 protesters of All India Panthers Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.