बसमध्ये प्रवास करताना रोकड, दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:12 AM2017-10-26T00:12:06+5:302017-10-26T00:12:06+5:30
बसमधून प्रवास करताना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन व रोकड असा एकूण ५४ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २४ आॅक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : बसमधून प्रवास करताना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन व रोकड असा एकूण ५४ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २४ आॅक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंढा नागनाथ येथून पुसद-परभणी बस क्रमांक एमएच-४०-एन- ९३७० मधून परभणी जिल्ह्यातील साळेगाव येथील आशामती मधुसूदन साळेगावकर प्रवास करीत होत्या. बस जवळा बाजार परिसरात येताच त्यांच्या गळ्यातील व पर्समधील कोणीतरी हातचलाखीने रोकड व सोन्याचे दागिने चोरले. काही वेळातच चोरट्यांनी डाव साधल्याचे आशामती सोडेगावकर यांच्या लक्षात आले. त्यांनी थेट ठाणे गाठून याप्रकरणी फिर्याद दिली. यावेळी बस ठाण्यात आणून तपासणी पोलिसांनी केली. परंतु चोरट्याचा शोध लागला नाही. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी सपोनि सुनील नाईक, राठोड, इम्रान सिद्दीकी, गणेश लेकुळे यांच्यासह ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी बसची तपासणी केली. बसमधील चोरट्याचा शोध लागला नसून पोलीस तपास करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून औंढा येथून प्रवासात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. काही महिलांना यापूर्वीही अशी चोरी करताना पकडले होते.