रोकड, सोन्या-चांदीचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:09 AM2017-08-28T00:09:58+5:302017-08-28T00:09:58+5:30
थील दाराचा कडीकोयंडा वाकवून अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करीत संदुकीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी सकाळी निदर्शनास आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथील दाराचा कडीकोयंडा वाकवून अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करीत संदुकीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी सकाळी निदर्शनास आली. याप्रकरणी गोरेगाव ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील सिद्धीविनायक गणेश मंदिरालगत असलेल्या प्रल्हाद रामभाऊ बांगर यांच्या घरात २६ आॅगस्ट रोजी चोरीची घटना घडली. रात्री घराच्या मागील बाजूच्या दारांचा कडीकोयंडा वाकवून चोरट्यांनी घरातील चौकामध्ये प्रवेश करीत बांगर कुटुंबिय झोपलेले असलेल्या खोलीच्या दाराची कडी बाहेरून लावून घेतली. त्यानंतर दुसºया खोलीत असलेल्या संदूक, पेट्या फोडून त्यामधील दीड तोळ्याची सोन्याची गहूमण्यांची पोत, तीस तोळे वजनाच्या चांदीच्या पाटल्या, रोख पाच हजार रुपये असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी सकाळी चोरीचा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी प्रल्हाद बांगर यांनी ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. तपास बीट जमादार भूमिराज कुमरेकर करीत आहेत. गत आठ दिवसांपूर्वी पोलीस ठाण्याच्या समोरील अंगणवाडी खोलीतून चोरट्यांनी तेल पाकिटे लंपास केल्याची घटना घडली होती. यापूर्वी ठाणे हद्दीत बºयाच चोरीच्या घटना घडल्या आहेत. वाढत्या चोºयांचे प्रमाणे बघता तत्परतेने तपास करून अंकुश लावणे अपेक्षित असताना मात्र पोलिसांकडून तपास कामात दुर्लक्ष होत आहे.