काळ्या बाजारात जाणारा गहू, तांदूळ पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:05 AM2021-05-22T04:05:02+5:302021-05-22T04:05:02+5:30
महालगाव येथून मधल्या मार्गाने एक धान्याने भरलेला संशयित टेम्पो लासूर स्टेशन येथील काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती ...
महालगाव येथून मधल्या मार्गाने एक धान्याने भरलेला संशयित टेम्पो लासूर स्टेशन येथील काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी सापळा रचला. तेव्हा गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास या संशयित टेम्पोला (क्र. एमएच २०, ईएल ३७१७) पोलिसांनी पकडले. यात गहू १८ गोणी व तांदळाची २२ गाेणी असे धान्य जप्त करण्यात आले. हे धान्य स्वस्त धान्य दुकानातील गरिबांना वाटप करण्यासाठी आलेले होते. मात्र ते काळ्या बाजारात विक्रीसाठी जात होते, असे शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पो. नि. रवींद्र खांडेकर यांनी सांगितले.
याबाबत तहसील विभागाला माहिती देण्यात आली आहे. जोपर्यंत त्यांच्याकडून पंचनामा होत नाही, तोपर्यंत गुन्हा दाखल होणार नसल्याचे खांडेकर यांनी सांगितले. मात्र शुक्रवारी दिवसभर महसूलचा एकही अधिकारी इकडे फिरकला नव्हता.