सावधान : संक्रांतीच्या वाणातून कोरोना तर पसरत नाही ना ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:03 AM2021-01-19T04:03:26+5:302021-01-19T04:03:26+5:30
अनेकदा संक्रांतीच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला एकेका महिलेच्या घरी ५० पेक्षाही अधिक महिलांना आमंत्रण असते. परंतु यंदा कोरोना संसर्गाचा धोका नको, ...
अनेकदा संक्रांतीच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला एकेका महिलेच्या घरी ५० पेक्षाही अधिक महिलांना आमंत्रण असते. परंतु यंदा कोरोना संसर्गाचा धोका नको, म्हणून १५-१५ महिलांचा गट करून प्रत्येक गटाला वेगवेगळ्या दिवशी आमंत्रित करण्याचे ठरविले आहे. जेणेकरून एकाच दिवशी गर्दी होणार नाही, असेही काही जागरूक महिलांनी सांगितले. हळदी-कुंकूसोबतच काही महिला तबकामध्ये तिळगुळासोबत थर्मल गनही सोबत ठेवत आहेत.
चौकट :
लस आली तरी धोका कायम
वाणाला जात असताना किंवा वाण घेण्यासाठी घरात कोणी आले असताना तोंडाला मास्क लावायला विसरू नका. सोबत सॅनिटायझरही अवश्य ठेवा. लस आली म्हणून दुर्लक्ष करू नका. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे.
चौकट :
पॉझिटिव्ह मृत्यू
१४ जानेवारी ४८ १
१५ जानेवारी ३६ १
१६ जानेवारी ३२ १
१७ जानेवारी ३८ २