सावधान, कोरोना रुग्णसंख्येचा पुन्हा चढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 01:22 PM2021-02-10T13:22:00+5:302021-02-10T13:24:03+5:30

corona virus patients increases in Aurangabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ३४८ झाली आहे, तर आतापर्यंत ४५ हजार ८७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Caution, re-ascending graph of corona patients | सावधान, कोरोना रुग्णसंख्येचा पुन्हा चढता आलेख

सावधान, कोरोना रुग्णसंख्येचा पुन्हा चढता आलेख

googlenewsNext
ठळक मुद्देदिवसभरात जिल्ह्यामध्ये ६८ रुग्णांची वाढसध्या २३४ रुग्णांवर सुरू उपचार आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढत आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाने खबरदारीचे पाऊल उचलण्याची गरज आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ६८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर २९ जण कोरोनामुक्त झाले. जालना जिल्ह्यातील एका रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ३४८ झाली आहे, तर आतापर्यंत ४५ हजार ८७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ६८ रुग्णांत मनपा हद्दीतील ६०, तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १९ आणि ग्रामीण भागातील १०, अशा एकूण २९ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. जालना जिल्ह्यातील ५७ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

१२ दिवसांत उपचार घेणाऱ्यांची संख्या दुप्पट
जिल्ह्यात २८ जानेवारी रोजी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९१ होती. तब्बल ११ महिन्यांनंतर उपचार घेणाऱ्यांची संख्या ९१ वर आली होती. मात्र, अवघ्या १२ दिवसांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २३४ वर गेली आहे.

मनपा हद्दीतील रुग्ण
प्रकाशनगर १, समर्थनगर १, शिवशक्ती कॉलनी १, छावणी ४, दुर्गा रोड परिसर १, स्वप्ननगरी १, एन - ७, सिडको ७, सिग्मा हॉस्पिटल परिसर १, संजय हौ. सो. २, सिडको एन-६ येथे २, एन-१, ब्लू बेल्स सोसायटी १, सातारा परिसर १, कांचनवाडी १, म्हाडा कॉलनी १, मयूर पार्क १, एन-५, सिडको १, एन-९, सिडको १, सिध्दार्थनगर, हडको १, एन-१, सिडको २, चिकलठाणा १, बीड बायपास परिसर १, चौधरी हेरिटेज, रेणुकामाता कमान २, जटवाडा रोड परिसर २, टीव्ही सेंटर, हडको १, मल्हार चौक १, एन-४, सिडको १, मुकुंदवाडी २, बन्सीलालनगर १, म्हाडा कॉलनी २, वेदांतनगर १, अन्य १४

ग्रामीण भागातील रुग्ण
पानवडोद, सिल्लोड १, वडगाव १, रांजणगाव शेणपुंजी १, लासूर स्टेशन १, अन्य ४.

Web Title: Caution, re-ascending graph of corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.