सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; शंभर टक्के विद्यार्थी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:04 AM2021-07-31T04:04:31+5:302021-07-31T04:04:31+5:30

कोरोना पार्श्वभूमीवर देशभरातील परिस्थिती लक्षात घेत सीबीएसईने दहावी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर करण्यात येत आहे. ...

CBSE XII results announced; One hundred percent student pass | सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; शंभर टक्के विद्यार्थी पास

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; शंभर टक्के विद्यार्थी पास

googlenewsNext

कोरोना पार्श्वभूमीवर देशभरातील परिस्थिती लक्षात घेत सीबीएसईने दहावी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर करण्यात येत आहे. त्यात बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. दहावीच्या अकरावी आणि बारावीच्या तिन्ही वर्गातील कामगिरीचे मूल्यमापन करीत हा निकाल तयार करण्यात आला. अंतर्गत मूल्यमापनामुळे बहुतांशी शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे.

छावणीच्या केंद्रीय विद्यालयातील ६० पैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे प्राचार्य एकांता पटेल यांनी सांगितले. पोदार इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल लागला असून, स्पर्श राणा (९५.६ टक्के) लावण्या शर्मा (९५ टक्के), किरण खामगांवकर, शंतनू बडगुजर (९४ टक्के) हे शाळेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आल्याचे प्राचार्य रविंदर राणा यांनी कळविले. पीएसबीए शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात सूरज शिंदे (९५.६ टक्के), गौरव कदम (९४.६ टक्के), अनिकेत महाजन (९४ टक्के) अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. जैन इंटरनॅशनल स्कूल माळीवाडा येथील ५४ पैकी ३८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले, तर १३ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले.

Web Title: CBSE XII results announced; One hundred percent student pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.