राज्यातील सर्व शहरे आणि पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:09 AM2017-09-24T00:09:43+5:302017-09-24T00:09:43+5:30

राज्यातील सर्व पोलीस ठाणी, सर्व शहरे आणि महत्त्वाच्या गावांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत

CCTV in all the cities and police stations in the state | राज्यातील सर्व शहरे आणि पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही

राज्यातील सर्व शहरे आणि पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सीसीटीव्हीमुळे गुन्हे रोखता येतात आणि गुन्हे उघड होण्यासाठीही सीसीटीव्ही महत्त्वाची महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे राज्यातील सर्व पोलीस ठाणी, सर्व शहरे आणि महत्त्वाच्या गावांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पूर्वी जिल्हा नियोजन विकास समितीकडून साडेतीन ते दहा टक्के निधी उपलब्ध होई. आता मात्र आम्ही सीसीटीव्ही निधीच्या खर्चासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष (हेड) तयार केले आहे, याबाबतचा अध्यादेश दोन दिवसांत निघेल, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
जालना येथे भर रस्त्यावर खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. या पार्श्वभूमीवर केसरकर हे जालना येथे भेट देऊन आल्यानंतर त्यांनी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्या कार्यालयात परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुंबई, पुण्याप्रमाणेच औरंगाबादसारख्या शहरातील महिला मोठ्या प्रमाणात नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडतात. महिलांसोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिले. काम करणाºया महिलांसाठी पुणे पोलिसांनी एक मॉडेल तयार केले. त्या मॉडेलचा वापर अन्य शहरांत करता येतो का, याची चाचपणी केली जात आहे. या मॉडेलनुसार आय.टी. सेक्टरमध्ये काम करणाºया १० ते २० महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी एका पोलीस हवालदारावर सोपविली जाते. तो त्यांचा सुरक्षा रक्षक म्हणूनच कायम त्यांच्या संपर्कात असतो. यामुळे त्यांच्यात सुरक्षेची भावना येते. शिवाय महिला आयपीएस अधिकारी आणि आमदार महिलांची कमिटी स्थापन केली.
दहशतवाद, नक्षलवाद, गुन्हेगारींकडे वळणाºया तरुणांचे समुपदेशन करून त्यांना नोकरी, व्यवसाय देता येईल का, हे पाहण्याचे कामही पोलिसांना करावे लागत आहे.

Web Title: CCTV in all the cities and police stations in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.