‘सीसीटीव्ही’, सुरक्षारक्षक असूनही सुरक्षा वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:28 AM2017-12-26T00:28:13+5:302017-12-26T00:28:23+5:30

घाटी रुग्णालय आणि मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेºयांसह सुरक्षारक्षक तैनात आहेत. तरीही या दोन्ही ठिकाणांची सुरक्षा वाºयावर असल्याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांतील घटनांनी आला. या दोन घटनांमुळे किमान यापुढे खबरदारी घेतली जाईल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांक डून व्यक्त होत आहे.

 'CCTV', despite being a security guard, on security | ‘सीसीटीव्ही’, सुरक्षारक्षक असूनही सुरक्षा वा-यावर

‘सीसीटीव्ही’, सुरक्षारक्षक असूनही सुरक्षा वा-यावर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालय आणि मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेºयांसह सुरक्षारक्षक तैनात आहेत. तरीही या दोन्ही ठिकाणांची सुरक्षा वाºयावर असल्याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांतील घटनांनी आला. या दोन घटनांमुळे किमान यापुढे खबरदारी घेतली जाईल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांक डून व्यक्त होत आहे.
एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच शनिवारी खळबळ उडाली. छावणीतील लोखंडी पुलावर बस अडवून कर्णपुरा येथील मैदानावर नेण्यात आली.
बॉम्बशोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथकाने बसमधील प्रत्येक प्रवाशासह बसची कसून तपासणी केली, तेव्हा बॉम्बची अफवाच असल्याचे निष्पन्न झाले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
कर्णपुरा येथे बसच्या तपासणीत काहीही नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बीडीडीएसच्या पथकाने मध्यवर्ती बसस्थानक येथे जाऊन अन्य शिवनेरी आणि अश्वमेध बसची तपासणी केली. ही घटना होत नाही तोच दुसºया दिवशी रविवारी घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या कार्यालयाशेजारी आढळलेल्या बेवारस वस्तूने दुपारी खळबळ उडाली. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने घाटीत जाऊन त्या वस्तूची तपासणी केली. या दोन्ही घटनांनी सुरक्षाव्यवस्थेचे पितळ उघडे पडले.
घाटीत १३४ ‘कॅमेरे’, १२४ सुरक्षारक्षक
घाटी रुग्णालयाच्या परिसरात १३४ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तर १२४ सुरक्षारक्षक आहेत. या संख्येमुळे घाटी रुग्णालयावर करडी नजर असल्याचे दिसते; परंतु रविवारच्या घटनेने ‘कोणीही या आणि काहीही ठेवून जा’ अशीच परिस्थिती दिसत आहे.
बसस्थानकात ९ सीसीटीव्ही, १३ सुरक्षारक्षक
मध्यवर्ती बसस्थानकात ९ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तर १३ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. यामध्ये एक सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे समजते. सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांच्या अखत्यारीत असून, एसटी महामंडळातर्फे लवकरच २७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. शिवनेरी बसमध्येही सीसीटीव्ही कॅमेरा असतो.
बसस्थानकात दररोज सातशेपेक्षा अधिक बसेस आणि २० ते २५ हजार प्रवाशांची ये-जा.
च्घाटीतील ‘ओपीडी’त दररोज १५०० ते २००० रुग्णांची नोंद.
सतर्क राहण्याच्या सूचना
रविवारची घटना ही सुरक्षारक्षकांमुळेच समोर आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर घाटी रुग्णालयात कार्यरत सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. काहीही संशयास्पद आढळल्यास तात्काळ सूचीत करण्याचे सांगितले आहे.
-डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी
योग्य खबरदारी
मध्यवर्ती बसस्थानकात १३ सुरक्षारक्षक असून, एका शिफ्टमध्ये चार सुरक्षारक्षक कार्यरत असतात. त्यांच्याकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. शनिवारी घडलेल्या घटनेनंतर नवीन काही सूचना प्राप्त झालेली नाही.
-स्वप्नील धनाड, आगार व्यवस्थापक (वरिष्ठ), मध्यवर्ती बसस्थानक

Web Title:  'CCTV', despite being a security guard, on security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.