सीसीटीव्ही फुटेजमुळे सापडला अट्टल घारफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:02 AM2021-09-05T04:02:17+5:302021-09-05T04:02:17+5:30
औरंगाबाद : बाहेरगावी गेलेल्या दाम्पत्याचे घर फोडून रोख रकमेसह साहित्य लंपास करणाऱ्या अट्टल घरफोड्याला जिन्सी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सय्यद ...
औरंगाबाद : बाहेरगावी गेलेल्या दाम्पत्याचे घर फोडून रोख रकमेसह साहित्य लंपास करणाऱ्या अट्टल घरफोड्याला जिन्सी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सय्यद हनिफ ऊर्फ बा सय्यद हबीब (वय २३, रा. शरीफ कॉलनी, अराफत मस्जिदजवळ) असे घरफोड्याचे नाव असून, त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी एलईडी टीव्ही, चार मोबाईल, चांदीचा हार आणि रोख ८६० रुपये जप्त केले.
रेवन श्रावण सोनवणे (२३, रा. गल्ली क्र .५, भवानी नगर, जुना मोंढाजवळ) यांची मावशी विजया ढोके आणि मावस भाऊ दि. १ ते ३ सप्टेंबर याकाळात बाहेरगावी गेले होते. दरम्यान, चोरट्याने घराचे कुलूप तोडून एलईडी टीव्ही, रोख दहा हजार रुपये, चांदीचा हार असा ऐवज लंपास केला. त्यावरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घरफोडीतील चोरट्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्यासह पथकाने घटनेच्या परसरातील सीसीटीव्हीचे फुटेज मिळविले. हे फुटेज गुप्त बातमीदारांपर्यंत पोहोचविण्यात आले. त्यांनी हा सय्यद हनिफ ऊर्फ बा असल्याचे सांगितले. त्यावरून सय्यद हनिफ याला शरीफ कॉलनी येथून ताब्यात घेतले, तेव्हा त्याने घरातून चोरीचा ऐवज काढून दिला. ही कामगिरी निरीक्षक व्यंकटराव केंद्रे, उपनिरीक्षक ठाकूर, सहायक फाैजदार संतप राठोड, नाईक हकीम शेख, नंदू परदेशी, सुनील जाधव, ज्ञानेश्वर बाविस्कर, संतोष यमनाथ यांच्या पथकाने केली आहे.
चौकट,
आरोपीच्या विरोधात दहापेक्षा अधिक गुन्हे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सय्यद हनिफ ऊर्फ बा सय्यद हबीब याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत दहापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्हे हे चोरीचे असल्याचेही पोलिसांनी सांगितले.