सीसीटीव्ही फुटेजमुळे खून, मंगळसूत्र चोरीसह अनेक लूटमारीच्या गुन्ह्यांचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:02 AM2021-05-25T04:02:11+5:302021-05-25T04:02:11+5:30

औरंगाबाद : तिसरा डोळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लोज सर्किट टीव्ही कॅमेऱ्यामुळे (सीसीटीव्ही) शहरातील खुनाच्या तीन घटना, गोळीबार, ...

CCTV footage reveals several robberies, including murder and Mangalsutra theft | सीसीटीव्ही फुटेजमुळे खून, मंगळसूत्र चोरीसह अनेक लूटमारीच्या गुन्ह्यांचा उलगडा

सीसीटीव्ही फुटेजमुळे खून, मंगळसूत्र चोरीसह अनेक लूटमारीच्या गुन्ह्यांचा उलगडा

googlenewsNext

औरंगाबाद : तिसरा डोळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लोज सर्किट टीव्ही कॅमेऱ्यामुळे (सीसीटीव्ही) शहरातील खुनाच्या तीन घटना, गोळीबार, तोतया पोलिसांकडून फसवणूक, मंगळसूत्र चोरी यासह वाहनचोरी, घरफोडी अशा गंभीर स्वरुपाच्या ४० हून अधिक घटनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे ७०० कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक ठाण्यात सरासरी २० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.

गोळीबार करणारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

आपल्याला नाकारणाऱ्या मुलीचे लग्न मोडण्यासाठी नवरदेवाच्या हॉटेलवर गोळीबार करण्यात आल्याची घटना ३० मार्च रोजी पडेगाव येथील रामगोपालनगरात घडली होती. गोळीबार करणारे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांना आरोपींची ओळख पटविता आली.

====(====(((=========

स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आलेल्या विकास देवचंद चव्हाण या तरुणाचा पाचशे रुपयांसाठी निर्घृण खून करण्यात आला. विकासला मारेकऱ्याने त्याच्या दुचाकीवर बसवून घेऊन जात असल्याची घटना विविध मार्गांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाली होती. यामुळे पोलिसांना या हत्येचा उलगडा करण्यात अवघ्या २४ तासांत यश आले.

===================

पिया मार्केटमध्ये बिअर शॉपीसमोर किरकोळ वादातून तरुणाचा खून करणारे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले होते. यामुळे या खुनाचा उलगडा सिटी चौक पोलिसांना करता आला. या खून प्रकरणातील गांधीनगरातील आरोपी सध्या जेलमध्ये आहेत.

======================

जाधववाडी येथे वृध्द महिलेला साडी वाटपाचे आमिष दाखवून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत पळविणारा भामटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. त्यानेच शहानूरमिया दर्गा परिसरातील एका महिलेला लिफ्ट देण्याचा बहाणा करून तिचे दागिने पळविले होते. तोही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याचे फुटेज आणि छायाचित्रे देशपातळीवरील पोलीस अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर शेअर केले. तेव्हा तो आरोपी हैदराबाद येथे पकडला गेल्याचे समजले. स्थानिक पोलीस लवकरच त्याला अटक करण्यासाठी जाणार आहेत.

================

मंगल कार्यालयांतून बॅगा पळविणारी टोळी कैद

पोलिसांच्या सूचनेनुसार आता बहुतेक मंगल कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वधू-वराच्या नातेवाइकांच्या किमती बॅगा पळविणारी तसेच अल्पवयीन मुलांकडून चोऱ्या करून घेणाऱ्या टोळीचा गतवर्षी गुन्हे शाखेने पर्दाफाश केला होता. ================

ऑइल गॅंगचे काम तमाम

पैशावाल्यांच्या वाहनांवर ऑइल टाकून त्यांची दिशाभूल करीत पैशाच्या बॅगा पळविणारी ऑइल गॅंग गुन्हे शाखेने दीड वर्षापूर्वी पकडली होती. ही टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाली होती.

===========

दुचाकीचोरीचे ३०हुन अधिक गुन्हे उघडकीस

दुचाकीचोरी करताना अथवा चोरलेली दुचाकी घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाल्याचे दिसताच पोलीस त्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवितात. अशाप्रकारे ३०हून अधिक दुचाकी चोरीच्या घटना विविध पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेने उघडकीस आणल्या.

===========

मंगळसूत्र चोरी आणि घरफोडी गुन्ह्यांची उकल

सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक गुन्हेगाराचा कर्दनकाळ ठरत आहेत. सिडकोत सकाळी अंगण झाडणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाला सीसीटीव्हीमुळे पोलिसांना पकडता आले. तो अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाल्याने पोलिसांनी या घटनेचे फुटेज मिळवून त्याच्यापर्यंत पोहोचता आले.

==============(

एन-३ मधील घरफोडी उघडकीस

सिडको एन-३ येथील निवृत्त सिव्हिल सर्जन यांचा बंगला फोडणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तेव्हा पोलिसांनी त्याच्या चालण्याच्या लकबवरून त्याची ओळख पटविली आणि त्याला बेड्या ठोकल्या.

Web Title: CCTV footage reveals several robberies, including murder and Mangalsutra theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.