योग दिन नावीन्यपूर्ण उपक्रमांसह साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:04 AM2021-06-17T04:04:21+5:302021-06-17T04:04:21+5:30
२० जून रोजी सायकल रॅली औरंगाबाद: योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना योग करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी २० जून रोजी सकाळी ...
२० जून रोजी सायकल रॅली
औरंगाबाद: योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना योग करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी २० जून रोजी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत क्रांती चौक ते जिल्हाधिकरी कार्यालयापर्यंत सायकल रॅलीचे आयोजन केल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी सांगितले.
दररोज १० हजार कोरोना चाचण्याची क्षमता
औरंगाबाद : जिल्ह्यात घाटी रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रयोगशाळा आणि जिल्हा रुग्णालयातील स्पाइस मोबाईल प्रयोग शाळा अशा तीन ठिकाणी दररोज जवळपास १० हजार कोरोना चाचण्यांची क्षमता तयार करण्यात आली असून अधिकाधिक संख्येने आरोग्य यंत्रणांनी स्वॅब घेण्याची व्यवस्था वाढवावी. आरटीपीसीआर चाचण्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणेला केले आहे.