वाळूज महानगरात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:19 PM2019-04-11T23:19:23+5:302019-04-11T23:19:33+5:30

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती गुरुवारी वाळूज महानगर परिसरात आरोग्य, तपासणी, शालेय साहित्य वाटप, निबंध स्पर्धा, व्याख्यान आदी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

 Celebrated in Mahatma Phule Jayanti in waluj | वाळूज महानगरात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

वाळूज महानगरात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

googlenewsNext

वाळूज महानगर : क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती गुरुवारी वाळूज महानगर परिसरात आरोग्य, तपासणी, शालेय साहित्य वाटप, निबंध स्पर्धा, व्याख्यान आदी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.


क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुरु-शिष्य जन्मोत्सव समितीतर्फे बजाजनगर येथे गुरुवारी सकाळी अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी चक्रधर डाके व कुमार बिरदवडे यांनी फुले यांचा जिवनपट सांगून त्यांच्या कार्याची माहिती दिली.

त्यानंतर वडगाव जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ५ ते ७ वी पर्यंतच्या २०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच येथील गणपती मंदिर प्रांगणात डॉ. संदीप राठोड यांच्या मार्गदर्शनखाली मोफत आरोग्य तपासणी शिबीर व निबंध स्पर्धा घेण्यात आली.

कार्यक्रमाला प.स. सदस्य सतिश पाटील, ग्रा.पं. सदस्य सुरेखा लगड, अशोक जगधने, हनुमान भोंडवे, गणेश घुले, आदिनाथ आडसरे, अशोक लगड, संजय सांभाळकर, साहेबराव पैठणकर, संतोष चौधरी, सुनंदा कुदळे, मोहन हाडोळे, पंढरीनाथ देवकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम पोतदार यांनी केले. तर अविनाश सोनटक्के यांनी आभार मानले.
वडगाव जि.प. शाळा ..
डॉ. हरिश्चंद्र रामटेके यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला सचिन वाघ, राजू खिल्लारे, पद्मसेना नागदिवे, वंदना पंडित, रिता मार्कंडे, अनिता राठोड, कदम यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पूजा वाघ यांनी केले.


क्रांतीगुरु साळवे विकास परिषद
अयोध्यानगर येथे मराठवाडा अध्यक्ष संजय सांभाळकर यांच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष नाना कांबळे, सुशिल रणनवरे, भगवान कांबळे, प्रकाश शेजवळ, रोहित भारस्कर, अनिल सोनवणे, सुनिल जोगदंड, सुशिल लोखंडे, भगवान मिसाळ आदींची उपस्थिती होती.


तीसगाव ग्रामपंचायत
ग्राविकास अधिकारी अशोक गायकवाड यांच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अंजन साळवे, संजय जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रा.पं. सदस्य अस्लम शेख, ईश्वरसिंग तरैय्यावाले, किशोर साळवे, अविनाश मोरे, सतिश महापुरे, किशोर म्हस्के, संदीप महापुरे, राहुल बनकर, हिरामण दणके आदींची उपस्थिती होती.

Web Title:  Celebrated in Mahatma Phule Jayanti in waluj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Walujवाळूज