रमजान ईद उत्साहात साजरी
By Admin | Published: July 30, 2014 12:33 AM2014-07-30T00:33:51+5:302014-07-30T00:55:04+5:30
उस्मानाबाद : मुस्लिम धर्मियांचा महत्त्वपूर्ण सण असलेली रमजान ईद मंगळवारी जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली़
उस्मानाबाद : मुस्लिम धर्मियांचा महत्त्वपूर्ण सण असलेली रमजान ईद मंगळवारी जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली़ सकाळी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करून चांगला पाऊस पडावा, यासाठी अल्लाहकडे दुआ करण्यात आली़ त्यानंतर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय नेतेमंडळींसह अधिकारी, सर्वधर्मीय नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती़
उस्मानाबाद येथील ख्वॉजा नगर परिसरातील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या़ यावेळी माजी खासदार डॉ़ पद्मसिंह पाटील, माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील, आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, जि़ प़ उपाध्यक्ष संजय पाटील, मुख्याधिकारी अजय चारठाणकर यांच्यासह विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या़
परंडा शहरात करमाळा राज्यमार्गावरील ईदगाहवर सामूहिक नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या़ शहरे काजी यांच्या उपस्थितीत आसिफअली काजी यांच्या घरापासून वाजत गाजत निघालेला मुस्लीम बांधवाचा मेळा सकाळी ९ च्या सुमारास करमाळा राज्यमार्गावरील ईदगाह मैदानावर पोहोचला. यावेळी नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या़ यावेळी ईदगाह मैदानावर तहसीलदार स्वरुप कंकाळ, पोलीस निरीक्षक हनुमंत वाकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरुनाथ चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक पारवे पाटील, नायब तहसीलदार एस. एस. पाडळे, पेशकार चित्तेवार, रांजणकर उपस्थित होते. भूम येथे नगर रोडवरील इदगाह मैदान येथे सर्व मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीत नमाज पठण पार पडले. गटनेता संजय गाढवे व नगरसेवकांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या़ यावेळी उपस्थित समाजबांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कळंब शहरातील ईदगाह मैदानावर माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांच्यासह विविध राजकीय पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या़
(प्रतिनिधी)
ग्रामीण भागातही उत्साह
शहरी भागासह ग्रामीण भागातही रमजान ईदचा उत्साह दिसून आला़ सर्वधर्मियांनी ईदमध्ये सहभागी होऊन मुस्लिम धर्मियांना शुभेच्छा दिल्या़ सर्वत्र शांतेत आणि उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली़
उमरगा येथे उत्साहात
उमरगा शहर व तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली़ यावेळी सर्वपक्षीय नेतेमंडळी, अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या़ आ़ ज्ञानराज चौगुले, संताजी चालुक्य, नेताजी गायकवाड, माधव पवार, जि.प. सदस्य कैलास शिंदे, बाबूराव शहापुरे, नगरसेवक विजय दळगडे, अतिक मुन्शी, विजय वाघमारे, सतीश सुरवसे आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या़
माणकेश्वरात मार्गदर्शन
भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे ईद सामूहिक नमाज अदा करण्यात आल्यानंतर इमाम बुबकर अहेमद अलहामेद (हाफीज) व जक्रीया उस्मान शेख बाबजीर यांनी रमजान ईदचे महत्व सांगितले. यावेळी परंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आवटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता़ नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या़