रमजान ईद उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2016 12:27 AM2016-07-08T00:27:21+5:302016-07-08T00:38:51+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यात रमजान ईद गुरुवारी उत्साहात साजरी झाली. लातूर शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९.४५ वाजता जमाअते-ए-इस्माईलचे प्रदेशाध्यक्ष तौफिक अस्लमखान यांनी बयान केले

Celebrating Ramzan Id | रमजान ईद उत्साहात साजरी

रमजान ईद उत्साहात साजरी

googlenewsNext


लातूर : लातूर जिल्ह्यात रमजान ईद गुरुवारी उत्साहात साजरी झाली. लातूर शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९.४५ वाजता जमाअते-ए-इस्माईलचे प्रदेशाध्यक्ष तौफिक अस्लमखान यांनी बयान केले. सकाळी १० वाजता मौलाना मुस्तफा मजाहिरी यांनी नमाज पठण करून अल्लाहकडे दुआ मागितली. त्यानंतर समाज बांधवांनी एकमेकांना ‘ईद’च्या शुभेच्छा दिल्या.
वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केला होता. ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती होती. मैदानच अपुरे पडले. शिवाजी चौकापर्यंत दुतर्फा नमाज पठणसाठी गर्दी झाली होती. यावेळी हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ‘ईद’च्या शुभेच्छा दिल्या. महापौर अ‍ॅड. दीपक सूळ, उपमहापौर चाँदपाशा घावटी, स्थायीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलिस अधीक्षक शिवाजीराव राठोड, भाजपाचे शैलेश लाहोटी, मोहन माने, राजा मणियार, समद पटेल, डॉ, खय्युम खान, जकी खान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, माजी आ. वैजनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे मकरंद सावे, माजी आमदार पाशा पटेल, महाराष्ट्र विकास आघाडीचे अ‍ॅड. आण्णाराव पाटील, बसवंतअप्पा उबाळे, नरेंद्र अग्रवाल, अ‍ॅड. विक्रम हिप्परकर, मोईज शेख, प्रा. व्यंकट कीर्तने यांच्यासह विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांचा प्रचंड मोठा जनसमुदाय उपस्थित होता. नमाज अदा केल्यानंतर प्रत्येकाने पाऊस पडावा यासाठी अल्लाहकडे दुआ मागितली. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक काही काळ बदलण्यात आली होती. सकाळी ८ वाजेपासून या रस्त्यावरील वाहतूक समांतर रस्त्यावरून वळविण्यात आली होती. १२ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक समांतर रस्त्यानेच झाली. ‘रमजान ईद’ निमित्त एकमेकांना शुभेच्छा देणे दिवसभर सुरू होते. त्याचबरोबर गुलगुले, शिरखुर्मा, शंकरपाळे, भजे, चिवडा अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घेत यंदाची ईद साजरी झाली. नातेवाईक, इष्टमित्रांनीही गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेतला.
रमजान महिना उत्साही वातावरणात पूर्ण झाला़ रमजानच्या पहिल्या दिवसापासून ढग आकाशात राहिले़ पाऊसही बरसला. सगळे संकेत अल्लाहकडूनच आहेत. जगात कुरआन एकच आहे़ रमजानमध्ये कुरआनचे अवतरण झाले. त्यामुळे तरावीहच्या नमाजमध्ये कुरआन पठण केले जाते़ आम्हाला प्रेषित हजरत इब्राहीम अलै़, मुसा अलै़ आणि अन्य प्रेषितांची शिकवण कळाली. त्यानुसार बंधुभाव वाढवा, असे तौफिक अस्लमखान आपल्या बयानात म्हणाले.

Web Title: Celebrating Ramzan Id

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.