फळ कापून, वृक्षारोपण करीत झाला वडाचा वाढदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:04 AM2021-07-10T04:04:07+5:302021-07-10T04:04:07+5:30
बाजारसावंगी : एक वर्षापूर्वी लागवड केलेल्या वडाच्या झाडाचा वाढदिवस वृक्षप्रेमींनी मान्यवरांच्या उपस्थितीत फळ कापून तसेच वृक्षारोपण करीत ...
बाजारसावंगी : एक वर्षापूर्वी लागवड केलेल्या वडाच्या झाडाचा वाढदिवस वृक्षप्रेमींनी मान्यवरांच्या उपस्थितीत फळ कापून तसेच वृक्षारोपण करीत माेठ्या थाटात साजरा केला. या अनोख्या उपक्रमाद्वारे वृक्ष वाचविण्याचा सामाजिक संदेश देण्यात आला आहे.
बाजारसावंगी पोलीस चौकीजवळील ग्रामपंचायतीच्या बाजारपट्टीत मोकळ्या जागेवर एक वर्षापूर्वी वडाचे झाड लावण्यात आले होते. हे झाड आता सात फुटांपर्यंत वाढले आहे. यामुळे येथील सय्यद मोईनोद्दीन, जानकीराम नलावडे, विश्वंभर नलावडे, संदीप नलावडे, संतोष पुंड, रवी जैन, ज्ञानेश्वर राऊत व इतरांनी गुरुवारी सायंकाळी माजी सरपंच भीमराव नलावडे व विलासराव धुमाळ यांच्या हस्ते या झाडास पुष्पहार घालून पपई फळ कापण्यात आले. यानंतर आणखी एका वृक्षाचे रोपण करीत उत्साहात वाढदिवस साजरा केला. यावेळी जमादार नवनाथ कोल्हे, संजय जगताप, योगेश नाडे, यतीन कुलकर्णी, विनोद बिघौत, पोपट काटकर, जानकीराम नलावडे, डिगांबर जाधव, संतोष पुंड, वैभव धुमाळ, सय्यद लाल, कांताराम आघाडे, शेख अझहर, रामेश्वर नलावडे, पंडित नलावडे व इतरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.
चौकट
ग्रामपंचायत पुरस्कार देणार
आगामी काळात वृक्षलागवड करून जोपासना करणाऱ्या वृक्षप्रेमीस ग्रामपंचायतीतर्फे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच ग्रामपंचायतीतर्फे त्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जाईल, अशी ग्वाही भीमराव नलावडे यांनी दिली.