तालुकास्तरावर कक्ष
By Admin | Published: September 30, 2014 11:39 PM2014-09-30T23:39:59+5:302014-10-01T00:27:40+5:30
वसमत : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)चे फॉर्म स्वीकारण्यासाठी आता तालुकास्तरावर आवेदनपत्र स्वीकृती कक्ष स्थापन केले जाणार आहेत.
वसमत : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)चे फॉर्म स्वीकारण्यासाठी आता तालुकास्तरावर आवेदनपत्र स्वीकृती कक्ष स्थापन केले जाणार आहेत. त्यामुळे टीईटी परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांची सोय होणार आहे. १ ते २१ सप्टेंबरपर्यंत आवेदनपत्रांची स्विकृती होणार आहे. यापूर्वी जिल्हास्तरावरच असे कक्ष होते.
टीईटी परीक्षांचे आवेदनपत्र स्वीकारण्याचे कक्ष केवळ जिल्हास्तरावरच असायचे, त्यामुळे परीक्षार्थ्यांची गैरसोय व्हायची व जिल्हास्तरीय संकलन परीक्षा परिषदेने या वेळी तालुकास्तरावर संकलन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. टीईटी परिक्षासाठी आॅनलाईन अर्ज केलेल्यांची नोंदणी प्रत व मूळ कागदपत्रे तपासण्यासाठी व स्वीकृत करण्यासाठी वसमत तालुक्यात गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. (वार्ताहर)