घनसावंगीत ९५ टक्के मतदान
By Admin | Published: January 15, 2017 11:18 PM2017-01-15T23:18:41+5:302017-01-15T23:22:17+5:30
तीर्थपुरी : घनसावंगी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली.
तीर्थपुरी : घनसावंगी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी २ हजार ३८७ म्हणजेच ९५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
या बाजार समिती निवडणुकीसाठी भाजपा-राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेना- काँग्रेस यांच्यात लढत झाली. संचालकांच्या १८ जागांसाठी ३८ उमेदवार रिगणात होते. रविवारी सकाळपासूनच मतदान केंद्रावर हक्क बजावण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती.
तीर्थपुरी केंद्रात सोसायटी मतदार संघातून १७७ पैकी १७३, ग्रा.पं. मध्ये १४३ पैकी १३९, व्यापारी गटातून १८७ पैकी १७६, अंतरवाली टेंभीमध्ये सोसायटी गटातून १०९ पैकी १०७, ग्रा.पं. मध्ये ९४ पैकी ९१, घनसावंगी येथे सोसायटी गटातून २४४ पैकी २३०, ग्रा.पं. मधून १५९ पैकी १४८ मतदान झाले. हमाल मापाडी गटातून १८९ पैकी १७२, राणी उंचेगाव येथे सोसायटी मतदार संघातून २०१ पैकी १८९, ग्रा.पं.मधून १४० पैकी १३३, रांजणी येथे सोसायटी गटातून १६२ पैकी १५७, ग्रामपंचायतमधून १२९ पैकी १२६, कुंभार पिंपळगाव येथे सोसायटी गटातून १५१ पैकी १४६, ग्रा.पं. गटातून १५४ पैकी १४६, व्यापारी गटात १७७ पैकी १६८ तर हमाल मापाडी गटात ९२ पैकी ८६ मतदारांनी मतदान केले.
या सोसायटीसाठी २५०८ मतदार होते. त्यातील २३८७ मतदारांनी मतदान केल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, तालुक्याच्या या बाजार समितीवर कोण वर्चस्व राखणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)