नवीन चौपदरी पुलाला केंद्राची मंजुरी
By Admin | Published: July 6, 2017 11:19 PM2017-07-06T23:19:33+5:302017-07-06T23:22:23+5:30
बीड : केंद्र शासनाने नवीन चौपदरी पूल उभारणीला बुधवारी मंजुरी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातून जाणाऱ्या धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील पूल धोकादायक बनल्याने बंद करण्यात आला आहे. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता. केंद्र शासनाने नवीन चौपदरी पूल उभारणीला बुधवारी मंजुरी दिली आहे.
मागील सहा महिन्यांपासून बिंदुसरा नदीवरील मुख्य पूल वाहतुकीस अयोग्य असल्याचे पत्र महामार्ग विभागाने दिले होते. त्यामुळे हा पूल बंद करुन वाहतुकीसाठी पर्यायी पूल उभारण्यात आला. पूर्ण उन्हाळा याच पुलावरुन वाहतूक झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या पावसात पर्यायी पूल वाहून गेला. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत होती. त्यानंतर हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करुन वाहतूक मांजरसुंबा व गढी मार्गे वळविण्यात आली. दरम्यान, पर्यायी पूल खचल्यानंतर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.