केंद्र सरकारने वेळ न दडवता मराठा समाजाला आरक्षण द्यावे: अमित देशमुख

By बापू सोळुंके | Published: November 10, 2023 07:04 PM2023-11-10T19:04:48+5:302023-11-10T19:22:00+5:30

सामाजिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य कोणत्याही नेत्यांनी करू नयेत, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेणे आवश्यक

Central government should give reservation to Maratha community without delay: Amit Deshmukh | केंद्र सरकारने वेळ न दडवता मराठा समाजाला आरक्षण द्यावे: अमित देशमुख

केंद्र सरकारने वेळ न दडवता मराठा समाजाला आरक्षण द्यावे: अमित देशमुख

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आपला पाठींबा आहे. केंद्र सरकारने आता वेळ न घालवता, मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, अशी आपली भूमिका असल्याचे माजीमंत्री आमदार अमित देशमुख यांनी येथे पत्रकारांना सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी  हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथे उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आ. देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी भेट घेतली. याभेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जरांगे पाटील यांनी आवश्यकतेनुसार नियमित औषधोपचार घ्यावेत, आराम करावा,काळजी घ्यावी असे सांगून त्यांची प्रकृती लवकरात लवकर ठणठणीत बरी व्हावी अशा शुभेच्छा दिल्याचे सांगितले. 

मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आपला पाठिंबा असल्याचे नमूद करून राज्य आणि केंद्र शासनाने आता वेळ न घालवता लवकरात लवकर मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे अशी आपली भूमिका असल्याचे स्पष्ट केले. राज्यात सामाजिक सलोखा कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे, सामाजिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य कोणत्याही नेत्यांनी करू नयेत, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी एका प्रश्नांचे उत्तर देताना सांगितले.

यावेळी छत्रपती संभाजी नगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख यूसूफ छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष,तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ काळे,छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते भाऊसाहेब जगताप, यांच्यासह सहकारी उपस्थित होते.

Web Title: Central government should give reservation to Maratha community without delay: Amit Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.