औरंगाबाद शहराची मध्यवर्ती बाजारपेठ ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:23 AM2018-05-18T00:23:34+5:302018-05-18T00:26:04+5:30

दंगलप्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ शहरातील मुख्य बाजारपेठ गुलमंडी, औरंगपुरा, कुंभारवाडा, रंगारगल्ली आणि मछली खडक येथील व्यापाऱ्यांनी गुरुवारी दुकाने बंद ठेवली.

Central market of Aurangabad city jam | औरंगाबाद शहराची मध्यवर्ती बाजारपेठ ठप्प

औरंगाबाद शहराची मध्यवर्ती बाजारपेठ ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देसेना कार्यकर्त्यांच्या अटकेचा निषेध: गुलमंडी, सराफा, पानदरिबा, कुंभारवाड्यात दुकाने बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दंगलप्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ शहरातील मुख्य बाजारपेठ गुलमंडी, औरंगपुरा, कुंभारवाडा, रंगारगल्ली आणि मछली खडक येथील व्यापाऱ्यांनी गुरुवारी दुकाने बंद ठेवली.
११ आणि १२ मे रोजी जुन्या शहरात दंगल झाली. या दंगलीत दोन जणांचा बळी गेला तर कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. याप्रकरणी पोलिसांनी दंगलखोरांविरुद्ध गुन्हे नोंदवून अटकसत्र सुरू केले. मंगळवारी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि एमआयएमचे विरोधी पक्षनेते फेरोज खान यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर बुधवारी शिवसेना कार्यकर्ता लच्छू पहिलवान (रा.धावणी मोहल्ला) याचा या दंगलीत सहभाग असल्याचे तपासात समोर येताच, विशेष तपास पथकाने बुधवारी रात्री सापळा रचून त्याला दिवाण देवडी येथे अटक केली.
गुरुवारी सकाळी शिवसेना कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ गुलमंडी, मछली खडक, दिवाण देवडी, राजाबाजार, औरंगपुरा, रंगारगल्ली आणि कुंभारवाडा येथील व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवली. मछली खडक आणि रंगारगल्लीतील काही दुकाने मात्र सुरू होती.
गुलमंडीवरील व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवावी, यासाठी दहा ते बारा जणांच्या एका टोळक्याने दुकाने बंद करा, बंद करा असे व्यापाºयांना ओरडून सांगितले. यामुळे घाबरुन व्यापाºयांनी दुकाने बंद केली.
शहरातील इतर भागांत व्यवहार मात्र सुरळीत
शिवसेना कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ गुलमंडी, औरंगपुरा, मछली खडक आणि राजाबाजार, पानदरिबा, कासारीबाजार, परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. मात्र रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. दुसरीकडे पैठणगेट, सिडको- हडको, टीव्ही सेंटर, गारखेडा परिसर, पुंडलिकनगर, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी आणि रेल्वेस्टेशन, उस्मानपुरा परिसरातील व्यावसायिक प्रतिष्ठाने नेहमीप्रमाणे सुरू होती. सिटी चौक, निरालाबाजार, टिळक पथ, समर्थनगर भागात दुकाने चालू होती.
लच्छू पहिलवानला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
मोतीकारंजा परिसरात दोन गटांत झालेली हिंसक दगडफेक व जाळपोळप्रकरणी लक्ष्मीनारायण ऊर्फ लच्छू बाबूलाल बाखरिया (४४, रा. धावणी मोहल्ला, पानदरिबा) याला गुरुवारी (दि.१७) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांनी २१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
आर्थिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण वाघ यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिली. मोतीकारंजा परिसरात रात्री सव्वा वाजता पेट्रोलिंग करीत असताना अप्पा हलवाई यांच्या दुकानासमोर एका दुकानास आग लागलेली दिसली. याठिकाणी पंधरा -वीस लोक आग लावून पळून गेले. त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. यामध्ये सुरेश नलवडे याच्या हातात धारदार कुकरी सापडली. उपरोक्त गुन्ह्यातील दहा व्यक्तींना पूर्वीच अटक करण्यात आली. त्यांची पोलीस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या गुन्ह्यात पोलिसांनी लच्छू पहिलवानला बुधवारी (दि.१६ मे) अटक केली. त्याच्यावर भादंवि कलम १४३, १४४, ४३६, १२० (ब), १०९ (पान २ वर)

Web Title: Central market of Aurangabad city jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.