विद्यापीठाचा युवक महोत्सव १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान

By योगेश पायघन | Published: September 19, 2022 08:52 PM2022-09-19T20:52:34+5:302022-09-19T20:53:20+5:30

केंद्रीय युवक महोत्सवात विद्यार्थ्यांना सहभागी करून जबाबदारी पार पाडा, कुलगुरूंचे महाविद्यालयांना आवाहन 

Central Youth Festival of the University from 16th to 19th October | विद्यापीठाचा युवक महोत्सव १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान

विद्यापीठाचा युवक महोत्सव १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान

googlenewsNext

औरंगाबाद -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा गाभा असलेली शोभायात्रा लक्ष वेधी ठरले. या महोत्सवात सहभागी न होणाऱ्या महाविद्यालयांवर १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, महाविद्यालयांनी केवळ परीक्षार्थी न घडवता विद्यार्थ्यांना सर्वांगीन जडणघडण करणाऱ्या उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून जबाबदारी पार पाडावी असे आवाहनही कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी केले आहे. 

विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान होत असून प्रशासनाने युवक महोत्सवाची नियमावली जाहीर केली आहे. युवक महोत्सवात ३६ कला प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यापीठातील विभाग, सर्व संलग्नीत ४८० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संघ महोत्सवात सहभागी होणे अनिवार्य असणार आहे. यावर्षी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष असून त्या थीमवर स्पर्धकांनी कला प्रकार सादर करावे, जेणेकरून मुक्तीसंग्रामाबद्दलची माहिती नव्या पिढीत होईल. असे कुलगुरू डाॅ. येवले यांनी सांगितले.

Web Title: Central Youth Festival of the University from 16th to 19th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.