सभापती तांबे यांचा राजीनामा ?
By Admin | Published: March 20, 2016 02:13 AM2016-03-20T02:13:37+5:302016-03-20T02:13:39+5:30
औरंगाबाद : सभापती विनोद तांबे यांनी अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या निष्क्रियतेला कंटाळून सभापतीपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींसह मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षांकडे दिला आहे.
औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती विनोद तांबे यांनी अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या निष्क्रियतेला कंटाळून सभापतीपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींसह मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षांकडे दिला आहे. यासंदर्भात शनिवारी दिवसभर जिल्हा परिषदेत चर्चा ऐकायला मिळाली. विनोद तांबे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण ते ‘नॉट रिचेबल’ होते.
शनिवारी स्थायी समिती व जलव्यवस्थापन समितीची बैठक होती. या दोन्ही बैठकांना विनोद तांबे गैरहजर राहिले. ते २२ मार्च रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेलाही उपस्थित राहणार नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. तांबे यांचा रोष अध्यक्ष महाजन यांच्या कार्यपद्धतीवर आहे. अध्यक्षांनी मागील सव्वा वर्षाच्या कार्यकाळात एकही ठोस काम केलेले नाही. त्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. तांबे यांच्यासह अन्य सभापती व अध्यक्षांकडे मोठ्या आशेने ग्रामीण भागातून नागरिक येतात; पण एकाचेही काम अध्यक्ष करू शकले नाहीत. त्यामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन झाली असून, अशा परिस्थितीत (पान २ वर)