कौन बनेगा पंचायत समिती सभापती

By Admin | Published: September 13, 2014 11:41 PM2014-09-13T23:41:01+5:302014-09-13T23:41:01+5:30

लातूर : जिल्ह्यातील दहाही पंचायत समिती सभापती पदांच्या निवडी रविवारी होणार आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात सभापती पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने फिल्डींग लावली आहे

Chairman of Kaun Banega Panchayat Samiti | कौन बनेगा पंचायत समिती सभापती

कौन बनेगा पंचायत समिती सभापती

googlenewsNext


लातूर : जिल्ह्यातील दहाही पंचायत समिती सभापती पदांच्या निवडी रविवारी होणार आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात सभापती पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने फिल्डींग लावली आहे तर सहलीवर गेलेले सदस्य थेट मतदानालाच पोहचनार आहेत़ लातूर, देवणी येथे निवडीची औपचारीकता शिल्लक आहेत तर चाकूर, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर, औसा या ठिकाणी जोरदार चुरस आहे़
लातूर पंचायत समितीचे सभापती पद अनुसुचित जातीसाठी राखीव आहे़ त्यामुळे काँग्रेसचे सुदाम भालेराव यांचे नाव आघाडीवर आहे़ उपसभापती पदासाठी चौघांनी जोरदार फिल्डींग लावली आहे़ देवणीच्या सभापती पदी संजय रेड्डी यांची वर्णी लागण्याचे निश्चित झाले आहे़ त्याचबरोबर राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या जळकोट पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती कमलताई माने प्रबळ दावेदार आहेत़ तसेच वनमाला फुलारी, सोंदरबाई सूर्यवंशी या ही दावा करु शकतात़ रेणापूरचे सभापती पद ओबीसी पुरुषासाठी अरक्षित असल्याने येथे चुरस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़
शिरुर अनंतपाळ पंचायत समितीच्या सभापती पदासाठी शितल सोनवणे व मिरा कांबळे यांच्यात जोरदार चुरस सुरु आहे़ तसेच निलंग्यातही चुरस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़
औसा पंचायत समितीत शिवसेनेच्या तीन व काँग्रेसच्या एका महिलेत स्पर्धा होणार असली तरी सुनिता हाळे यांचे नाव आघाडीवर आहे़ (प्रतिनिधी)
अहमदपूर पंचायत समितीचे सभापती पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे़ सभापती पदासाठी काँग्रेसकडून अ‍ॅड़ शेळके तसेच आयोध्या केंद्रे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे़ माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील हे आपली शक्ती कोणाच्या पारड्यात टाकतात, त्यावर सभापती ठरणार आहे़
४चाकूर पंचायत समितीत काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत़ पंचायत समितीत राष्ट्रवादीचे ७, काँग्रेसचे ३, शिवसेना आणि भाजपाचा प्रत्येकी १ सदस्य आहेत़ मागील निवडीवेळी रष्ट्रवादीने स्वबळाव२ सत्ता हस्तगत केली़ वर्चस्व आहे़ राष्ट्रवादीने काँग्रेसला उपसभापती पदाची आॅफर देवून त्यांचे तीन सदस्य आपल्याकडे घेण्याचा घाट घातला आहे़ सभापती पदी करीमसाब गुळवे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे़ उपसभापती पदासाठी शनिवारी चाकूरात काँग्रेसच्या मल्लिकार्जून मानकरी यांनी तीन सदस्यांच्या मुलाखती घेतल्या असून त्यात काँग्रेसच्या शिल्पा कल्यानी उपसभापती पदाचे दावेदार असल्याचे सांगण्यात येते़ राष्ट्रवादीचे ७ सदस्य असले तरी अ‍ॅड़माधवराव कोळगावे हे मध्यंतरी आम आदमी पार्टीत गेल्याने राष्ट्रवादी त्यांना बेरजेत धरत नाही़ त्यामुळे राष्ट्रवादीकडे ६ सदस्य असल्याने अखे२ काँग्रेसशी एकोपा करणे राष्ट्रवादीला हिताचे आहे़ दरम्यान, अ‍ॅड़ कोळगावे यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर मी निवडून आल्याने सध्या राष्ट्रवादीच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले़ मी जरी भारिप बहुजन महासंघात असलो तरी या निवडणूकीपूरताच संबंध राहणार आहे़ त्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीशी काहीही संबंध राहणार नसल्याचे ते म्हणाले़

Web Title: Chairman of Kaun Banega Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.