चाकूहल्ला करून दोन विद्यार्थ्यांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:09 PM2018-11-19T22:09:43+5:302018-11-19T22:09:57+5:30
औरंगाबाद : अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि दोन मोबाईल, एटीएम कार्ड असा सुमारे १३ हजारांचा ऐवज लुटला. ही घटना नक्षत्रवाडी परिसरातील संताजी चौकी ते बजाजगेटकडे रस्त्यावर रात्री दहा वाजेच्या सुमारास रविवारी (दि़ १८) घडली़ या संदर्भात सातारा पोलीस ठाण्यात योगेश फकीरबा शिनगारे (२०, रा. वडोद बाजार, ता. फुलंब्री) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
औरंगाबाद : अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि दोन मोबाईल, एटीएम कार्ड असा सुमारे १३ हजारांचा ऐवज लुटला. ही घटना नक्षत्रवाडी परिसरातील संताजी चौकी ते बजाजगेटकडे रस्त्यावर रात्री दहा वाजेच्या सुमारास रविवारी (दि़ १८) घडली़ या संदर्भात सातारा पोलीस ठाण्यात योगेश फकीरबा शिनगारे (२०, रा. वडोद बाजार, ता. फुलंब्री) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिल्लोड तालुक्यातील वडोद बाजार येथील योगेश फकीरबा शिनगारे हा कांचनवाडी येथे राहतो. तो एका महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे़ १८ रोजी रात्री योगेश हा त्याचा मित्र सौरभ ठेंगरे (२०, रा. राजापिंपरी, ता. गेवराई जि. बीड) याच्यासह दुचाकीने संताजी पोलीस चौकीसमोरून बजाजगेटकडे जात होते. एका बाभळीच्या झाडाआडून अचानक रस्त्यावर आलेल्या चौघांनी त्यांना अडविले. अनोळखी लुटारूंनी योगेश आणि सौरभवर चाकूने वार करून त्यांना जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील रोख अडीच हजार रुपये, दोन मोबाईल, एटीएम कार्ड काढून घेतले.
यानंतर लुटमार करणारे तेथून पसार झाले. या घटनेनंतर गंभीर जखमी योगेश व सौरभला तेथून जाणाऱ्या नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. सौरभला अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लुटमारप्रकरणी संशयित चौघांविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.