‘चल रिक्षा में बैठ’;रिक्षाचालकाकडून तरुणींचा पाठलाग, मोपेडसमोर रिक्षा आडवी लावत लगट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 11:51 AM2023-07-15T11:51:48+5:302023-07-15T11:53:17+5:30

रात्री पेट्रोल भरण्यासाठी निघाल्या होत्या मैत्रिणी

‘Chal rickshaw mein bait’; Chasing young women by rickshaw driver, driving rickshaw upside down in front of moped | ‘चल रिक्षा में बैठ’;रिक्षाचालकाकडून तरुणींचा पाठलाग, मोपेडसमोर रिक्षा आडवी लावत लगट

‘चल रिक्षा में बैठ’;रिक्षाचालकाकडून तरुणींचा पाठलाग, मोपेडसमोर रिक्षा आडवी लावत लगट

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : रिक्षाचालकाने प्रवासी तरुणीला अश्लील प्रश्न विचारल्याची घटना ताजी असताना पुन्हा एका रिक्षाचालकाने दोन तरुणींचा पाठलाग करून ‘रिक्षात बसते का,’ अशी विचारणा केली. बुधवारी मध्यरात्री तरुणी मैत्रिणीसह बाबा चौकाच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी चालक इम्रान खान सलीम खान (३५, रा. आमखास मैदान परिसर) याला शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

रोजाबागमध्ये राहणारी ३१ वर्षीय तरुणी १३ जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजता मैत्रिणीसह मोपेडवर दुचाकीवरून बाबा चौकाकडे पेट्रोल भरण्यासाठी जात होती. आमखास मैदानाजवळून रिक्षाचालकाने दोघींचा पाठलाग सुरू केला. एसटी विभागीय कार्यालयाच्या परिसरात अंधारात तिच्या दुचाकीसमोर रिक्षा आडवी उभी करून त्याने लगट करण्याचा प्रयत्न करत ‘चल रिक्षा में बैठ’ असे धमकावले. रिक्षात बसलेला दुसरा तरुण खाली उतरताच तरुणींनी मोबाइल काढत ‘पोलिसांना फोन करते’ म्हणत आरडाओरड सुरू केली. त्यामुळे दोघांनी पोबारा केला. सकाळी सहा वाजता तरुणीने मित्रासोबत क्रांती चौक ठाण्यात तक्रार दाखल केली.

रिक्षाचालकाचा अजब जबाब
निरीक्षक संतोष पाटील यांनी तत्काळ डीबी पथकाला तपासाचे आदेश दिले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आमखासपासून चालक तरुणींचा पाठलाग करत असल्याचे दिसते. पोलिसांनी तपास करून इम्रानला शुक्रवारी ताब्यात घेतले. चौकशीत मात्र त्याने अजब जबाब दिला. ओळखीच्या साजिदच्या सांगण्यावरून दुचाकीवर त्याची बहीण आहे, ती कुठे जात आहे, हे पाहायला आम्ही निघालो होतो, असे सांगितले; परंतु, आम्ही त्यांना थांबवताच दिसले की, ती साजिदची बहीण नव्हती. तरुणींनी आमच्या कानशिलात लगावली. घाबरून आम्ही निघत असताना आमची पुढे रिक्षादेखील उलटली, असे सांगितले. तरुणीने मात्र साजिद नावाच्या कुठल्याच तरुणाला ओळखत नसल्याचे स्पष्ट केले. साजिदचा शोध सुरू आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर नेमका प्रकार स्पष्ट होईल, असे पाटील यांनी सांगितले.

Web Title: ‘Chal rickshaw mein bait’; Chasing young women by rickshaw driver, driving rickshaw upside down in front of moped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.