आरोग्य विभागातील विविध ५४ पदासाठीच्या भरती प्रक्रियेला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:06 AM2021-02-23T04:06:50+5:302021-02-23T04:06:50+5:30
औरंगाबाद : एकाच दिवशी होणाऱ्या आरोग्य विभागातील विविध ५४ पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या अनुषंघाने राज्य ...
औरंगाबाद : एकाच दिवशी होणाऱ्या आरोग्य विभागातील विविध ५४ पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या अनुषंघाने राज्य शासन आणि आरोग्य विभागास नोटीस बजावण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही.गंगापूरवाला आणि न्या. एस .डी. कुलकर्णी यांनी सोमवारी (दि.२२) दिला . याचिकेची पुढील सुनावणी २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे .
२०१९ सारी ऑनलाइन अर्ज मागविलेल्या नेत्र चिकित्सक, पाठ्य निर्देशिका (टुटर), अधिपरिचारिका , प्रयोगशाळा सहाय्यक आदी अवैद्यकीय आणि तांत्रिक अशा विविध ५४ पदांसाठी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी दोन सत्रात लेखी परीक्षा होणार आहे. राज्यभरातील विविध उमेदवारांनी यातील एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केले आहेत. आरक्षित उमेदवारांना प्रत्येक अर्जासाठी ३०० रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी ५०० रुपये फी होती. ही परीक्षा विविध कारणांमुळे झाली नाही. पुढे ढकलण्यात आली. आता या सर्व पदांसाठी २८ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी परीक्षा होणार असल्यामुळे अनेक उमेदवार इतर पदांच्या परीक्षा देऊ शकणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. औरंगाबादेतील काही उमेदवारांनी ॲड. विष्णू यादवराव पाटील आणि ॲड. डॉक्टर स्वप्नील तावशीकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे.