खैरेंचे राजकारण संपविण्याची खेळी 'मातोश्री'च्या आशीर्वादाने : शिरसाट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:19 AM2024-09-23T11:19:21+5:302024-09-23T11:20:40+5:30

दानवे व शिरसाट हे दोस्त, ते काहीही बोलतात : चंद्रकात खैरे

Chandrakant Khaire politics with the blessings of Matoshri says Sanjay Shirsat | खैरेंचे राजकारण संपविण्याची खेळी 'मातोश्री'च्या आशीर्वादाने : शिरसाट

खैरेंचे राजकारण संपविण्याची खेळी 'मातोश्री'च्या आशीर्वादाने : शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वादात शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी उडी घेतली आहे. खैरेंचे राजकारण संपविण्याच्या खेळीला 'मातोश्री'चा आशीर्वाद असल्याचे आ. शिरसाट म्हणाले, तर दानवे आणि शिरसाट हे दोस्त असून, शिरसाट हे काहीही बोलतात, अशी टीका खैरे यांनी 'लोकमत'शी बोलताना केली. मुंबईत शनिवारी 'मातोश्री'वर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याला खैरे यांना दूर ठेवण्यात आले. त्यामुळे दानवे-खैरे वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट?

'खैरेंचे पैसे संपले आहेत. त्या ठिकाणी त्यांना प्रवेश कसा मिळेल? खैरेंनी निष्ठेने काम केले आहे. शिवसेनाप्रमुखांपासून आतापर्यंत जे काही कार्यक्रम होत असत, त्याची जबाबदारी खैरे घ्यायचे. त्यांना 'मातोश्री'वर प्रवेश मिळत नाही, हे दुर्दैव आहे. खैरेंचे राजकारण संपविण्यासाठी जी खेळी आहे, त्याला 'मातोश्री'चा आशीर्वाद असल्याशिवाय हे घडणे शक्य नाही.'

मातोश्री'वर माझी वेगळी बैठक होणार 

शिरसाट यांनी केलेल्या दाव्याबाबत खैरे म्हणाले की, 'मातोश्रीवरील बैठक अंबादास दानवे यांनी आयोजित केलेली होती. त्या बैठकीला मला कशाला बोलवतील. मातोश्रीवर माझी वेगळी बैठक होणार आहे. दानवे आणि शिरसाट दोस्त आहेत. शिरसाट काहीही बोलतात.' 
 

Web Title: Chandrakant Khaire politics with the blessings of Matoshri says Sanjay Shirsat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.