चंदनचोरांची टोळी शिरापूरमध्ये जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2016 12:53 AM2016-07-16T00:53:02+5:302016-07-16T01:15:52+5:30
पाटोदा : शिरापूर धुमाळ (ता. शिरुर) येथून गुरुवारी रात्री चंदनचोरांची टोळी पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जेरबंद केली. टोळीत तीन आरोपींचा समावेश असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
पाटोदा : शिरापूर धुमाळ (ता. शिरुर) येथून गुरुवारी रात्री चंदनचोरांची टोळी पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जेरबंद केली. टोळीत तीन आरोपींचा समावेश असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
पाटोदा येथील ठाणे हद्दीत येणाऱ्या शिरापूर धुमाळ येथील चव्हाणवाडी रस्त्यावर चंदनचोर दबा धरुन बसल्याची माहिती पथकातील फौजदार के. एस. लहाने यांना कळाली होती. त्यावरुन सापळा लावला. आजीनाथ रंगनाथ मोरे, देवीदास हरिभाऊ पवार, हरी धोंडीबा पवार (सर्व रा. नवगण राजुरी ता. बीड) यांना पकडले. विष्णू बांगर (रा. उक्कडपिंप्री) हा फरार झाला. पकडलेल्या आरोपींकडून नऊ किलो चंदनाचे लाकूड, दुचाकी, कटर व इतर साहित्य असा ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून तपास सहायक फौजदार एस. एम. राठोड करत आहेत. आरोपींना शुक्रवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांचंी पोलीस कोठडी सुनावली. (वार्ताहर)