वैद्यकीय शिक्षणात बदल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:31 AM2017-10-30T00:31:01+5:302017-10-30T00:31:11+5:30

वैद्यकीय शिक्षणाचा कालावधीही अधिक आहे. त्यामुळे हा कालावधी कमी करण्यासह वैद्यकीय शिक्षणात काही बदलांची शिफारस करण्यात आली आहे. त्याचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती डॉ. गिरीश मैंदरकर यांनी दिली.

Change in medical education ? | वैद्यकीय शिक्षणात बदल?

वैद्यकीय शिक्षणात बदल?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देशातील वैद्यकीय शिक्षण परदेशातील पुस्तकांवर आधारित आहे. मात्र परदेशातील आणि भारतातील आजारांमध्ये फरक आहे. वैद्यकीय शिक्षणाचा कालावधीही अधिक आहे. त्यामुळे हा कालावधी कमी करण्यासह वैद्यकीय शिक्षणात काही बदलांची शिफारस करण्यात आली आहे. त्याचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण धोरण समितीचे सदस्य, ‘एमसीआय’चे सदस्य तसेच कॉलेज आॅफ फिजिशियन अ‍ॅण्ड सर्जनचे अध्यक्ष डॉ. गिरीश मैंदरकर यांनी दिली.
इंडियन रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशनअंतर्गत इंडियन कॉलेज आॅफ रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग आणि महाराष्ट्र रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेत रविवारी (दि.२९) डॉ. गिरीश मैंदरकर यांनी मार्गदर्शन
केले.
याप्रसंगी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी त्यांनी संवाद साधला. देशात राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे पुनर्मूल्यांकन करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. त्याअंतर्गत देशभरातील सहा तज्ज्ञांची राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण धोरण समिती बनविण्यात आली असून, त्यात डॉ. मैंदरकर यांचा समावेश आहे.
वैद्यकीय शिक्षणात कोणते बदल आवश्यक आहेत, यासंदर्भात समिती शिफारशी करणार आहे. भारतात कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, संसर्गजन्य आजार आढळतात. तुलनेत परदेशात वेगळे आजार आहेत. याचा विचार झाला पाहिजे. वैद्यकीय शिक्षणाचा कालावधी साडेपाच वर्षांचा आहे. हा कालावधी साडेतीन ते चार वर्षांचा करावा, प्रात्यक्षिकांवर अधिक भर देणारा हवा, असे काही बदल सुचविण्यात आल्याचे डॉ. मैंदरकर यांनी सांगितले.

Web Title: Change in medical education ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.