घर बदलले, रस्ता बदला तरीही तो पिच्छा सोडेना,अल्पवयीन मुलाचे विकृत तरुणाकडून लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 04:10 PM2022-03-17T16:10:29+5:302022-03-17T16:11:21+5:30

अल्पवयीन मुलाला चिडवीत तरुणाकडून लैंगिक शोषण; सहनशीलता संपल्यामुळे पोलिसांत धाव

Change of house, change of road but he did not give up, sexual abuse of a minor by a perverted youth | घर बदलले, रस्ता बदला तरीही तो पिच्छा सोडेना,अल्पवयीन मुलाचे विकृत तरुणाकडून लैंगिक शोषण

घर बदलले, रस्ता बदला तरीही तो पिच्छा सोडेना,अल्पवयीन मुलाचे विकृत तरुणाकडून लैंगिक शोषण

googlenewsNext

औरंगाबाद : दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलाला अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी भर रस्त्यावर अडवून जबरदस्ती करणाऱ्या विकृत तरुणाविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दीड वर्षापासून सतत त्रास देणाऱ्या तरुणाविरोधात मुलाने तक्रार दिली. किरण निकाळजे (२८), असे विकृत तरुणाचे नाव आहे.

गारखेडा परिसरातील १६ वर्षीय मुलगा आई, वडील आणि बहिणीसोबत राहतो. त्याच्या घरापासून काही अंतरावर राहणारा विकृत किरण निकाळजे हा गल्लीतून जाता-येता मुलाला चिडवीत असायचा. त्याच्या विकृतीला मुलगा अक्षरश: कंटाळला होता. त्यामुळे त्याने चिडवीत असल्याचा प्रकार त्याच्या आईला सांगितला. मुलाच्या आईने किरणला जाब विचारल्यावर दोन्ही कुटुंबांत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतरही किरणचे चिडवणे थांबले नाही. त्यामुळे हे कुटुंब घर बदलून दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले. तरीही किरण येऊन मुलास चिडवू लागला. त्यानंतर त्याने मुलाच्या शाळेतसुद्धा जाण्यास सुरुवात केली. 

हा देखील प्रकार मुलाने आईला सांगितला. त्यावरून त्याच्या आईचे आणि किरणचे पुन्हा भांडण झाले. २ नोव्हेंबर २०२१ रोजी मुलाचे आई-वडील कामावर गेलेले असताना बाळंतपणासाठी आलेल्या बहिणीला व मुलाला मारहाण करण्यासाठी किरण निकाळजे आणि त्याचे दोन नातेवाईक घरी आले. त्यांनी या दोन्ही बहीण-भावांना मारहाण केली होती. त्यानंतर गेल्या डिसेंबर महिन्यात निकाळजे मुलाच्या शाळेत गेला. त्याने मुलाची मान पिरगाळून त्याला धरून ठेवले. त्यावेळी त्याने मुलाला पोलिसांत तक्रार केली तर तुझ्यावर अत्याचार करीन, अशी धमकी दिली. शाळा सुटण्यावेळी किरण बाहेर येऊन थांबायचा. रस्त्यात थांबवून हात पकडून धक्का देणे असे प्रकार नेहमीचे झाल्यामुळे अखेर मुलाने कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

बहिणीवर अत्याचाराची धमकी
आरोपीने मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांत तक्रार दिल्यास बहिणीवरही अशाच पद्धतीने अत्याचार केले जातील, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Change of house, change of road but he did not give up, sexual abuse of a minor by a perverted youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.