परिवर्तन निश्चित होऊ शकते

By Admin | Published: June 29, 2014 12:40 AM2014-06-29T00:40:35+5:302014-06-29T00:44:56+5:30

जालना : जनतेने ठरवले तर परिवर्तन निश्चित होऊ शकते हे संपूर्ण देशाने नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत अनुभवले आहे, असे प्रतिपादन जिल्हा संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले.

Changes can be fixed | परिवर्तन निश्चित होऊ शकते

परिवर्तन निश्चित होऊ शकते

googlenewsNext

जालना : जनतेने ठरवले तर परिवर्तन निश्चित होऊ शकते हे संपूर्ण देशाने नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत अनुभवले आहे, असे प्रतिपादन जिल्हा संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले. माझा महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र या अभियानातंर्गत जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते शनिवारी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, उपनेते लक्ष्मण वडले, सहसंपर्क नेते शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, आ. संतोष सांबरे, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, जि.प.अध्यक्षा आशाताई भुतेकर, जगन्नाथ काकडे, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुध्दे, संजय हर्षे, अनिरुध्द खोतकर, सविता किवंडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, जनतेने ठरवले तर परिवर्तन निश्चित होऊ शकते हे संपूर्ण देशाने नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत अनुभवले आहे. राज्यात आता शिवसेनेने माझा महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र हे अभियान हाती घेतले.
या अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी मतदार नोंदणी जागृती, शिवसैनिक नोंदणी, शिवबंधन मेळावे, नविन शाखा स्थापना करणे, उद्घाटन, मेळावे, सभा, शिवसेना फलक, सामान्य नागरिकांची प्रलंबित कामे सोडविण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, लोकसभेप्रमाणे जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत क्रांती करण्यासाठी सज्ज व्हावे व त्यादृष्टीने कामाला लागून राज्यात शिवशाहीचे शासन आणावे व हीच खरी शिवसेनाप्रमुखांना श्रध्दांजली ठरेल.
उपनेते लक्ष्मण वडले म्हणाले की, प्रत्येकाने त्याला शक्य असेल ते करावे व मनापासून झटावे. या आघाडी सरकारने सर्वच स्तरातील नागरिकांना अतिशय त्रस्त करुन सोडले असून त्यांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले. या जिल्हास्तरीय मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, माझा महाराष्ट्र -भगवा महाराष्ट्र हे अभियान निवडणुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे असून प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या गावात व क्षेत्रात जाऊन शासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर ठेवावा. याच मेळाव्यात संपर्कप्रमुख यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षा आशाताई भुतेकर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले.
यावेळी सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, आ. संतोष सांबरे यांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख पंडितराव भुतेकर, रावसाहेब राऊत, भगवानराव कदम, माधवराव कदम, सतिषराव घाटगे, तालुकाप्रमुख संतोष मोहिते, रवींद्र आर्दड, अंकुश शिंदे, कैलास पुंगळे, परमेश्वर जगताप, हनुमान धांडे, प्रसाद बोराडे, अशोक बरकुले यांच्यासह अ‍ॅड. भास्कर मगरे, भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे, सविता किवंडे, प्रा. लक्ष्मण गोर्डे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी यांच्यासह जि.प.सदस्य, पं.स. सदस्य, विभागप्रमुुख, उपविभागप्रमुख, नगरसेवक आदींची उपस्थिती होती.
(प्रतिनिधी)

Web Title: Changes can be fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.