जिल्हा न्यायालयातील कामकाजाच्या वेळेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:05 AM2021-03-26T04:05:02+5:302021-03-26T04:05:02+5:30
गुरुवारपासून ( दि.२५) दि. ९ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी १०:३० ते दुपारी १:०० आणि दुपारी १:३० ते ४:०० या ...
गुरुवारपासून ( दि.२५) दि. ९ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी १०:३० ते दुपारी १:०० आणि दुपारी १:३० ते ४:०० या दोन सत्रात प्रत्येकी अडीच अडीच तास न्यायालयीन कामकाज होईल, असा कार्यालयीन आदेश प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीपाद डी. टेकाळे यांनी जारी केला आहे.
सुनावणीस गैरहजर राहिल्याच्या कारणावरून वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी यांच्याविरुद्ध न्यायाधीशांनी कुठलाही आदेश करू नये. त्या दिवशी सुनावणी असलेल्या प्रकरणातील वकील, पक्षकार, साक्षीदार आणि आरोपी यांनाच न्यायालयात प्रवेश दिला जाईल. संबंधिताचे प्रकरण सुनावणीस आल्यानंतर नावाचा पुकारा झाला तरच न्यायदान कक्षात प्रवेश दिला जाईल. सुनावणी होताच संबंधितांनी त्वरित न्यायदान कक्षाच्या बाहेर जावे ,असे आदेशात म्हटले आहे.