आडूळ जिप शाळेच्या मुख्याध्यापिकेचा अनागोंदी कारभार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:59+5:302020-12-17T04:33:59+5:30

आडूळ : आडूळ जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या प्रभारी मुख्याध्यापिकेने मनमानी कारभार करून शालेय पोषण आहार व शाळा अनुदान ...

Chaotic management of the headmistress of Aadul Zip School! | आडूळ जिप शाळेच्या मुख्याध्यापिकेचा अनागोंदी कारभार !

आडूळ जिप शाळेच्या मुख्याध्यापिकेचा अनागोंदी कारभार !

googlenewsNext

आडूळ : आडूळ जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या प्रभारी मुख्याध्यापिकेने मनमानी कारभार करून शालेय पोषण आहार व शाळा अनुदान बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून गैरव्यवहार केला आहे, असा आरोप शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंत्री भुमरे, जिप सीईओ, शिक्षण उपसंचालक, शिक्षण व आरोग्य सभापती यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे.

पैठण तालूक्यातील आडूळ (बु.) येथे जिल्हा परिषदेची पाचवी ते दहावीपर्यंतची शा‌ळा आहे. या परिसरातील एकमेव उच्च माध्यमिक शाळा असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या आहे. २०१२ पासून या शा‌ळेचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून चेतना रविंद्र तायडे या कार्यरत आहेत. या शाळेत नवीन नव्यानेच व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली आहे. तरी देखील समितीच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर जुन्या अध्यक्षांच्या सहीने सप्टेंबर व ऑक्टोबर २०१९ या कालावधीत आडूळ शाखेच्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शालेय पोषण आहार व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाळा अनुदान बँक खात्यातून परस्पर पैशाचा आर्थिक व्यवहार केला आहे. तसेच प्रवेश निर्गम उताऱ्यासाठी व शालेय दाखला काढण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांकडून सर्रासपणे विना पावती रक्कम वसूल केली जात आहे.

शाळेच्या प्रांगणात गावातील लग्न समारंभ संपन्न होतात. त्यासाठी ग्रामस्थांकडून प्रत्येकी दीड ते दोन हजार रुपये नियम बाह्य वसूल केले जातात. त्याची शाळेतील कुठल्याही अभिलेखात नोंद झालेली नाही. टीसी, प्रवेश निर्गम व लग्न समारंभाची सदरील जमा झालेली रक्कम ही स्वतःच्या फायद्यासाठी वापरत आहे. या सर्व अनागोंदी कारभाराची शालेय व्यवस्थापन समितीने विचारणा केली असता मुख्याध्यापिका चेतना तायडे यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे मुख्यध्यापिका यांनी शाळेच्या बॉक खात्यावरून परस्पर अफरातफर केलेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांनी केली आहे.

यापूर्वी देखील अनेक वेळा ग्रामस्थ, पालक, शाळेतील इतर कार्यरत सर्व शिक्षकांनी व माजी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. परंतु त्यांची तक्रार देखील प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. त्याकडे वरिष्ठ पातळीवर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तायडे यांच्यावर कोणाच वरदहस्त आहे. त्यामुळे गैरव्यवहार केल्याचा आरोप असून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशी चर्चा रंगू लागली आहे.

----------

सदरील प्रकरण अतिशय गंभीर असून यापूर्वी अनेक वेळा विद्यार्थ्यांच्या पालकांनी, ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावेळेस मुख्याध्यापीका चेतना तायडे यांना तोंडी समज देऊन सुद्धा त्यांच्यात कोणताही बदल झाला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनी या प्रकरणात लक्ष घालून २०१२ पासून आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. - शुभम पिवळ, पं. स. सदस्य, पैठण.

------------

आम्ही दर महिन्याच्या बैठकीत हा मुद्दा वेळोवेळी उपस्थित केला आहे. परंतू प्रभारी मुख्याध्यापिका चेतना तायडे यांनी समितीचे समाधान होईल, असे उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे आम्ही वरिष्ठ कार्यालयात यासंबंधी तक्रार नोंदविली आहे. शालेय व्यवस्थापन समितीला शाळेच्या व्यवहारात विश्वासात न घेता त्या सध्या शाळेत मनमानी कारभार करीत असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली आहे. - रंजना गिरी, शालेय व्यवस्थापन समिती, उपाध्यक्ष.

---------

तायडे यांनी बोलण्यास टाळले

याप्रकरणी प्रभारी मुख्याध्यापिका चेतना तायडे यांना विचारले असता त्यांनी यावर उत्तर देण्याचे टाळले. तर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) सुरजप्रसाद जैस्वाल यांच्याशी वेळोवेळी मोबाईलवर कॉल केला असता तसेच व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Chaotic management of the headmistress of Aadul Zip School!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.