बाल सुधारगृहातील ‘प्रभारी’ कारभार !
By Admin | Published: January 29, 2017 11:51 PM2017-01-29T23:51:08+5:302017-01-29T23:52:39+5:30
लातूर शहरातील लेबर कॉलनी परिसरात असलेलया बालसुधार गृहातील कारभार ‘प्रभारी’वरच सुरु आहे.
राजकुमार जोंधळे लातूर
शहरातील लेबर कॉलनी परिसरात असलेलया बालसुधार गृहातील कारभार ‘प्रभारी’वरच सुरु असून, सातपैकी तीन पदे सध्याला रिक्त आहेत. एकाच आठवड्यात दोन अट्टल गुन्हेगाराने पलायन केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे बाल सुधारगृहातील प्रशासनाच्या कारभारावराची लक्तरेच या गुन्हेगारांनी टांगली आहेत. येथील सुरक्षा व्यवस्था सहज भेदता येते. याची जाणिव झाल्यानंतरच या दोन गुन्हेगारांनी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून सुधारगृहातून लपायन केले आहे.
लेबर कॉलनी परिसरात २५ क्षमता असलेले बालगृह आणि २५ क्षमता असलेले निरीक्षणगृह आहे. या सुधारगृहात अल्पवयीन गुन्हेगारांची रवानगी केली जाते. येथे या गुन्हेगारांवर चांगले संस्कार करुन त्यांना सुधारण्याचे काम केले जाते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या सुधारगृहाला अवकळा प्राप्त झाली आहे. सुधारगृहातील एकूण सात मंजूर कर्मचाऱ्यांची पदे आहेत. यामध्ये अधीक्षक, शिक्षक, लिपीक, स्वयंपाकी आणि चार काळजीवाहक अशी कर्मचाऱ्यांची संख्या आहे. यापैकी काळजीवाहकाचे एक रिक्त तर एक पद न्याय प्रक्रियेत अडकले आहे. विशेष म्हणजे, अधीक्षक पदही प्रभारीच आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर शुक्रवारी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. आता पाचपैकी एक अधीक्षक आणि दोन काळजीवाक असे एकूण तीनच कर्मचारी कार्यरत आहेत. अर्थात दोनच कर्मचाऱ्यांवर सध्याला सुधारगृहातील कामकाज सुरु आहे.