गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘प्रभारीं’चे ग्रहण

By Admin | Published: June 22, 2014 11:13 PM2014-06-22T23:13:01+5:302014-06-23T00:25:30+5:30

कळंब : ९१ गावचा कारभार हाकणाऱ्या कळंब पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला वर्षभरापासून प्रभारीचे ग्रहण लागले आहे़

In-charge of the Department of Rural Development took charge of 'In-charge' | गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘प्रभारीं’चे ग्रहण

गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘प्रभारीं’चे ग्रहण

googlenewsNext

कळंब : ९१ गावचा कारभार हाकणाऱ्या कळंब पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला वर्षभरापासून प्रभारीचे ग्रहण लागले आहे़ वर्षभरात तब्बल पाच बीडीओंनी काही काळासाठी कारभार हाती घेतला़ त्यामुळे विविध गावातील अनेक योजनांची कामे रखडली असून, सर्वसामान्यांची हेळसांड होत आहे़ तालुकास्तरावर महत्त्वपूर्ण असलेले पद कायमस्वरूपी भरण्यासाठी मात्र तालुक्यातील राजकीय नेतेमंडळींसह वरिष्ठांनी मात्र साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे़
त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत जिल्हा परिषद व ग्रामपंचायत स्तरातील दुवा म्हणून पंचायत सिमती तालुकास्तरावर काम करते़ जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत विविध योजनांवर संनियंत्रण ठेवून सक्षमपणे योजनांची अंमलबजावणीत पंचायत समितीची भूमिका महत्त्वाची असते़ शिवाय तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कारभारावर देखरेख करण्यापासून नागरिकांना वैयक्तिक योजनांचा लाभ मिळवून देणे, निधी वितरित करणे, तांत्रिक व प्रशासकीय देखभाल करणे आदी कामे पंचायत समितीकडून केली जातात़
एप्रिलपासून पद रिक्त
कळंब पंचायत समितीत मार्च २०१३ मध्ये गटविकास अधिकारी म्हणून प्रमोद काळे कार्यरत होते़ त्यांनी एप्रिलमध्ये वैद्यकीय रजा दिली़ त्यानंतर त्यांनी कळंबला परत रुजू होण्याऐवजी बदली करून घेण्यासाठी खटाटोप सुरू केली़ अखेर त्यांची करमाळा येथे बदली झाली़ त्यामुळे एप्रिलपासून पंचायत समितीला कायम गटविकास अधिकारी लाभलाच नाही़ वर्षभरापासून येथील पद रिक्त असून, इतरत्र ग्रामविकास विभागाकडून बदलीचा आदेश निघाला तरी कळंब पंचायत समितीला मात्र एकही कायम अधिकारी मिळाला नाही़ (वार्ताहर)
वर्षभरात झाले पाच प्रभारी
कळंब पंचायत समितीत वर्षभरात पाच प्रभारी अधिकाऱ्यांनी कामकाज चालवले आहे़ प्रमोद काळे यांच्यानंतर उस्मानाबाद येथील महाग्रारोहयोचे गटविकास अधिकारी परमेश्वर माने यांनी प्रभारी कामकाम हाती घेतले़ त्यांनी कामाला गती आणली न् आणली तोच त्यांनी आपल्या मूळ गावी जाणे पसंत केले़ त्यानंतर लोहारा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बी़आऱढवळशंख यांच्या हाती कामकाज सोपविण्यात आले़ त्यांनीही दोन महिन्यातच कामकाज आटोपले़ तद्नंतर भूमचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अशोक माहोर यांनी कार्यभार स्वीकारला़ मात्र, त्यांचे अकाली निधन झाले़ यामुळे पुन्हा गटविकास अधिकारी पदाचा प्रश्न निर्माण झाला़ मार्च अखेर उमरगा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी आऱयु़चाकोर यांच्याकडे कळंब येथील पदभार देण्यात आला़ त्यांची सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून तुळजापूरला आदेश निघाल्याने आता कळंबचे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी श्री यमपुरे हे काम पाहत आहेत़ अशा प्रकारे रिक्त असलेल्या पदावर पाच प्रभारी अधिकाऱ्यांनी काम केले आहे़
नियुक्तीकडे
सर्वांचेच दुर्लक्ष
पंचायत समितीतील सभापतीपद शिवसेनेकडे असून, उपसभापतीपद काँग्रेसकडे आहे़ तर विरोधी गटात राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष आहेत़ एकूणच कळंब पंचायत समितीवर राजकीय प्राबल्य असून, सत्ताधारी पक्षातील सदस्य असतानाही गत वर्षाभरापासून येथील गटविकास अधिकाऱ्यांचे कायमस्वरुपी पद भरण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची शोकांतिका आहे़ सर्वपक्षीयांनी राजकीय ताकद पणाला लावून हे पद भरणे गरजेचे असतानाही याकडे दुर्लक्ष केल्याची भावना व्यक्त होत आहे.

Web Title: In-charge of the Department of Rural Development took charge of 'In-charge'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.