तिसऱ्या श्रावणी शनिवारनिमित्त फळांनी केला भद्रा मारूतीचा आकर्षक शृंगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 07:08 PM2018-09-01T19:08:29+5:302018-09-01T19:11:56+5:30
श्रावणी शनिवारनिमित्त विविध फळांनी भद्रा मारूती मूर्तीचा आकर्षक शृगांर केल्याने ती आकर्षक व सुंदर दिसत होती.
खुलताबाद (औरंगाबाद) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी श्रावणाच्या तिस-या शनिवारी भाविकांची मोठी गर्दी केली. श्रावणी शनिवारनिमित्त औरंगाबाद येथील जयसुख पटेल यांनी विविध फळांनी भद्रा मारूती मूर्तीचा आकर्षक शृगांर केल्याने ती आकर्षक व सुंदर दिसत होती.
श्रावण महिन्याचा तिसरा शनिवार असल्याने ऱात्रीपासुनच खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी औरंगाबाद शहर तसेच जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही अनेक भाविक पायी निघाले होते. यात औरंगाबाद शहर परिसरातून येणा-या भाविकांची संख्या मोठी होती. पायी येणा- या भाविकांच्या सोयीसाठी औरंगाबाद ते खुलताबाद मार्गावर ठिकठिकाणी सेवाभावी, सामाजिक संस्थेतर्फे चहापाणी व फराळांची व्यवस्था करण्यात आली होती.
भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी रात्रीपासुनच भाविक खुलताबादेत दाखल होत होते. जय भद्राचा जयघोष करीत भाविकांंच्या पालखी सवाद्य मिरवणुकीने खुलताबाद शहराच्या चोहोबाजुच्या रस्त्याने येत होत्या. रात्रीपासुनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पवनपुत्र हनुमान कि जय, बजरंग बली कि जय, भद्रा हनुमान कि जय म्हणत भाविक दर्शन घेत होते. सकाऴपासुन तर गर्दीत वाढ झाली दिवसभर हनुमानभक्तांची वर्दऴ सुरूच होती. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
दिवसभर जिल्ह्यातून, परजिल्ह्यातून. दर्शनासाठी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दिवसभर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. औरंगाबाद येथील जयसुख पटेल हे श्रावण महिन्यात दररोज भद्रा मारूतीचा आकर्षक शृगांर करतात त्यातच श्रावणामधील दर शनिवारी वेगवेेगळ्या फऴा-फुलांनी ,मोत्यांनी शृगांर करतात. आज तिस-या शनिवारी त्यांनी व निलेश देशमुख,वल्लभ लढ्ढा,श्रीप्रकाश पुरवार,संजय काळे यांनी केळी, केळीचे खांब (केळीच्या घडासहीत) , मोसंबी, डाळींब, सफरचंद,टरबुज, कच्च्या कैरी, चिकू, लिंबू , केळीचे फुले या सर्व फळफुलांनी भद्रा मारुती मूर्तीचा आकर्षक शृगांर केला होता. मुर्तीची आगळावेगळा शृगांर केल्यामुळे दिवसभर हा शृगांर करणा-या हनुमानभक्तांचे कौतूक होत होते.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता एस.टी.महामंडळाच्यातीने जादा बसेसची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक हरीश खेडकर व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. भाविकांचे सुरऴीत दर्शन व्हावे म्हणून भद्रा मारूती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पा. बारगळ, सचिव कचरू पा. बारगळ, विश्वस्थ लक्ष्मण फुलारे, लक्ष्मण वरपे, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे व कर्मचारी पदाधिकारी व स्वंयसेवक परिश्रम घेत होते.