चावडी वाचन झाले, सातबारा दुरुस्ती नाही

By Admin | Published: July 15, 2017 11:52 PM2017-07-15T23:52:28+5:302017-07-15T23:53:20+5:30

हिंगोली : जिल्ह्यात सातबारा दुरुस्तीचे काम केवळ दीड टक्का शिल्लक असले तरीही पीक पाहणीचा कॉलमच नसल्याची बोंब आहे.

Chawadi is read, Satara is not repaired | चावडी वाचन झाले, सातबारा दुरुस्ती नाही

चावडी वाचन झाले, सातबारा दुरुस्ती नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात सातबारा दुरुस्तीचे काम केवळ दीड टक्का शिल्लक असले तरीही पीक पाहणीचा कॉलमच नसल्याची बोंब आहे. शिवाय चावडी वाचनात २५ हजारांच्या आसपास तक्रारी आल्या होत्या. त्यांचा निपटारा हस्तलिखितांशिवाय करणे शक्य नसल्याने ही वेगळी समस्याही आ वासून उभी आहे.
जिल्ह्यात एकूण १.८0 लाख सातबारा आहेत. यात हिंगोली ४00३0, औंढा-२७५५४, कळमनुरी-३६४३४, वसमत-३६४२६, सेनगाव-४0१६४ अशी तालुकानिहाय संख्या आहे. त्यापैकी बंद झालेल्यांची संख्या १५३ एवढी आहे. तर दुरुस्तीची गरज न पडता कन्फर्म झालेल्या सातबारांची संख्या यात हिंगोली-२0२७१, औंढा-८१७६, कळमनुरी-१४७४१, वसमत-१२0७६, सेनगाव-१0३३0 अशी संख्या आहे. तर १.१३ लाख सातबारा या दुरुस्त कराव्या लागणार होत्या. त्यापैकी बहुतांश तक्रारी निकाली काढल्याचे सांगितले जात असले तरीही चावडीवाचनानंतर पुन्हा २५ हजारांच्या आसपास तक्रारी आल्या आहेत. त्यातच सातबारा दुरुस्ती करणारे सॉफ्टवेअरही अर्धवटच माहिती घेते. त्यात पीक पाहणीचा महसूल प्रशासनासाठीचा महत्त्वाचा असणारा कॉलमच नाही. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत सातबारा दुरुस्ती करून संगणकीकृत कामकाज सुरू करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसत आहे. एकीकडे शासन मात्र संगणकीकृत सातबाराचाच वापर विविध योजनांसाठी करण्याचा हेका लावून बसले असताना दुसरीकडे ही परिस्थिती आहे.
डेडलाईन नावालाच
चावडी वाचन झाल्यानंतर आलेल्या तक्रारींचा निपटारा वेळेत करणेच शक्य नाही. त्यातील अनेक तक्रारी रास्त असणार आहेत. सातबारातील चुका, नावातील दुरुस्ती, फेर योग्य लागला नाही, अशा तक्रारींचा पूर्णपणे निपटारा होईपर्यंत सातबारा अद्ययावत होणे शक्य नसल्याने ही डेडलाईन नावालाच उरण्याची शक्यता आहे. पीक पाहणीचा कॉलम तर अजूनही अडचणीचा ठरणार आहे. त्यात काही ठिकाणी कुळाची नावेही दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने मात्र हे काम गतिमान करण्यासाठी तलाठ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. अनेक तलाठी यामुळे अडचणीत येण्याचीही शक्यता आहे.

Web Title: Chawadi is read, Satara is not repaired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.