स्वस्त धान्य दुकानदार ई-पॉझ मशीन परत करणार
By | Published: December 6, 2020 04:01 AM2020-12-06T04:01:58+5:302020-12-06T04:01:58+5:30
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेकडून तहसीलदार विक्रमसिंह राजपूत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संघटनेने ...
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेकडून तहसीलदार विक्रमसिंह राजपूत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
संघटनेने केलेल्या मागण्यांवर केंद्र व राज्य सरकार कोणतीही सकारात्मक भूमिका घेत नसल्यामुळे ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर फेडरेशनच्या वतीने, तसेच एन. डी. ए. सरकारद्वारा पारित कृषी बिलामुळे देशभरातील परवानाधारक बाधित होणार असून, आमच्या व्यवसायावरही गदा येण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील परवानाधारकांच्या वाहतुकीचा प्रश्न, धान्य वाटप, वितरणासंदर्भात जिल्हा स्तरावर बैठका घेण्याबाबत सूचित करावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी तालुका स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक संघटनेचे अध्यक्ष रफिक शेरखान पठाण, मधुकर काका बरडे, पंडित पारधे, पंडित गोडसे, संजय पाटील, अजीज पठाण, ठकूबा काकडे, सलीम बागवान यांच्यासह दुकानदार उपस्थित होते.
फोटो - तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष रफिक शेरखान पठाण, मधुकर काका बरडे, पंडित पारधे, पंडित गोडसे, संजय पाटील, अजीज पठाण, ठकूबा काकडे आदी.