सहा वारसदार असताना एकच दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:21 PM2017-11-16T23:21:27+5:302017-11-16T23:21:35+5:30
सहा वारसदार असताना केवळ एकच वारसदार दाखवून बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी नगर परिषदेच्या तीन कर्मचा-यांसह चार जणांविरूध्द न्यायालयाच्या आदेशाने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्नड : सहा वारसदार असताना केवळ एकच वारसदार दाखवून बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी नगर परिषदेच्या तीन कर्मचा-यांसह चार जणांविरूध्द न्यायालयाच्या आदेशाने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नाजराबी नजमोद्दीन शेख (रा. पांढरी मोहल्ला, कन्नड) यांची मिळकत क्र.११/३२६ मध्ये काही एक हक्क नसताना सदर मिळकतीवर बेकायदेशीर कब्जा करुन राहत असून तिच्या आईची मिळकत नं.११/१७८ असून तिला ६ वारस असताना एकटीच वारस असल्याचे खोटे सांगून लोकसेवक आरोपी सुरेश कामतीकर, देविदास पाटील व प्रशांत देशपांडे यांनी संगनमत करुन नं.११/१७८ ला तिचे नाव नमुना नं.४७ च्या उता-याला लावून घेतले.