ऊस उत्पादकांची साखर कारखान्यांकडून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:54 PM2017-12-04T23:54:56+5:302017-12-04T23:55:04+5:30
राज्यातील ऊस उत्पादक शेतकºयांची शासन आणि साखर कारखान्यांकडून एफआरपीबाबत फसवणूक करण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांची शासन आणि साखर कारखान्यांकडून एफआरपीबाबत फसवणूक करण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. एफआरपी प्रकरणात येत्या अधिवेशनात दाखल केलेल्या लक्षवेधीवर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे चर्चा होऊ देणार नाहीत, कारण ते अध्यक्ष असलेल्या कारखान्याकडूनही शेतक-यांची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्य शासनाने उसाला प्रति टन २५५० रुपये हमीभाव जाहीर केला. प्रत्यक्षात हमीभावातून औरंगाबाद जिल्ह्यात ४३४ रुपये तोडणी व वाहतूक खर्च कपात केला जाणार आहे. म्हणजेच शेतकºयांच्या हाती २११६ रुपये (पान २ वर)
बागडेंकडून शेतक-यांची पिळवणूक
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कारखान्याकडून शेतकºयांची पिळवणूक होत असून, ते शेतकºयांचे हित पाहत नाहीत, असा आरोप आ. जाधव यांनी केला. मी अधिवेशनात मांडलेली लक्षवेधी लावून शेतकºयांच्या प्रश्नावर त्यांनी मार्ग काढावा. एफआरपी म्हणजे २५५० रुपये थेट शेतकºयांच्या हाती पडले पाहिजेत, तोडणी व वाहतुकीचा खर्च त्यातून कपात करू नये, अशी मागणी जाधव यांनी केली.
जाधव यांनी एफआरपीचे सूत्र समजून घ्यावे
आ. जाधव यांनी आरोप करण्यापूर्वी एफआरपीचे सूत्र समजून घ्यावे. शेतकºयांना जास्तीचा भाव दिलेला आहे. २५५० चे सूत्र असून त्यातून वाहतूक, तोड वजा करण्यात येईल. फील्डवर काम करणाºयाचे वेतनही त्यातच धरावे असे त्या सूत्रात नमूद आहे. एफआरपीचा भाव ९.५ टक्के वसुलीला आहे. ७.५ टक्के वसुली आहे. सध्या २० किलो साखर प्रतिटनामागे कमी उत्पादित होत आहे, असे प्रत्युत्तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाधव यांना दिले.