सखींसाठी आज तपासणी शिबीर
By Admin | Published: October 26, 2015 11:54 PM2015-10-26T23:54:54+5:302015-10-27T00:27:40+5:30
बीड : ‘लोकमत’ च्या सखी मंच सदस्यांसाठी लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या विद्यमाने २७ आॅक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
बीड : ‘लोकमत’ च्या सखी मंच सदस्यांसाठी लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या विद्यमाने २७ आॅक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
आॅक्टोबर महिन्यात स्तनकॅन्सर जागृती केली जाते. त्यानुषंगाने ‘लोकमत’ने सखी मंच सदस्यांच्या आरोग्य तपासणीची मोफत संधी उपलब्ध करुन दिली आहे. महिलांमध्ये स्तनकॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे या शिबीरात तज्ज्ञ डॉक्टर स्तनकॅन्सरची प्राथमिक तपासणी करतील.
स्तनकॅन्सरची लक्षणे आढळल्यास पुढील तपासण्यांमध्ये ३० टक्के सवलतही लाईफलाईन हॉस्पिटलने उपलब्ध केली आहे. इतर आरोग्य तपासण्या देखील होतील. यावेळी डॉ. संतोष शिंदे, डॉ. उज्ज्वला शिंदे, डॉ. जया रायमोळे, डॉ. रेश्मा गवते, डॉ. वृषाली सानप, डॉ. अनिल सानप हे स्तनकॅन्सर व महिलांच्या आरोग्यबाबत मार्गदर्शन करणार आहेत. लाभ घेण्याचे आवाहन ‘लोकमत’ सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)