छत्रपती संभाजीनगरात पोलिस आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची खांदेपालट

By राम शिनगारे | Published: May 30, 2023 11:35 AM2023-05-30T11:35:19+5:302023-05-30T11:36:02+5:30

वाळूज एमआयडीसी व गुन्हे शाखेच्या निरीक्षकांमध्ये आदलाबदल

Chhatrapati Sambhaji Nagar police commissioner release transfers orders of officers | छत्रपती संभाजीनगरात पोलिस आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची खांदेपालट

छत्रपती संभाजीनगरात पोलिस आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची खांदेपालट

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : आयुक्तालयात नव्याने दाखल सहायक पोलिस आयुक्तांच्या पदस्थापनेसह सात पोलिस निरीक्षकांची खांदेपालट करण्यात आली. वाळूज एमआयडीसीचे वरिष्ठ निरीक्षक संदीप गुरमे यांची गुन्हे शाखेत तर गुन्हे शाखेतील अविनाश आघाव यांना त्यांच्या जागेवर पाठविले आहे. नियंत्रण कक्षात संलग्न केलेले वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांना उस्मानपुरा पोलिस ठाणे दिले. बदल्याचे आदेश पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी रात्री उशिरा काढले आहेत.

सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांना शहर विभाग, साईनाथ ठोंबरे यांना सिडको विभाग, धनंजय पाटील यांना गुन्हे शाखा, रणजित पाटील यांना उस्मानपुरा विभागाचा पदभार देण्यात आला. निवृत्तीच्या उंबरठ्यावरील सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ यांची विशेष शाखेत बदली केली. पोलिस निरीक्षकांमध्ये गुन्हे शाखेचे अविनाश आघाव यांची एम. वाळूज ठाण्याच्या निरीक्षकपदी नेमणूक झाली तर निरीक्षक संदीप गुरमे यांना गुन्हे शाखा देण्यात आली. विठ्ठल पोटे यांची सीटीचौक, वाळूज वाहतुक शाखेचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांची बेगमपुरा, गिता बागवडे यांची वाळूज, अशोक गिरी यांची उस्मानपुरा, सचिन इंगोले यांची वाळूज वाहतूक शाखेच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. त्याशिवाय एम. वाळुजचे दुय्यम निरीक्षक गणेश ताठे, वेदांतनगरचे ब्रम्हा गिरी आणि सायबरच्या निरीक्षक प्रविणा यादव यांची तात्पुरत्या स्वरुपातील नियुक्ती त्याचठिकाणी पूर्णवेळ केल्याचेही आदेशात म्हटले आहे.

किराडपुऱ्यातील कामाचे बागवडेंना बक्षीस?
किराडपुरा भागात जाळपोळीच्या घटनेमध्ये जमावाला सक्षमपणे सामोरे जाणाऱ्या उस्मानपुऱ्याच्या निरीक्षक गिता बागवडे यांना वाळूज पोलिस ठाणे देत त्यांना पोलिस आयुक्तांनी बक्षीसच दिले. तर गुन्हे शाखा व एम. वाळूज पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांची आदलाबदलच होणार ही अटकळ मागील पोलिस आयुक्तांच्या कार्यकाळापासून बांधली जात होती. नवीन पोलिस आयुक्तांनी त्यावर शिक्कामोर्तब केले.

Web Title: Chhatrapati Sambhaji Nagar police commissioner release transfers orders of officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.