वाळूज एमआयडीसीत हातमोज्याच्या कंपनीला भीषण आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 07:35 AM2023-12-31T07:35:41+5:302023-12-31T07:35:56+5:30
Maharashtra Gloves Manufacturing Factory Fire: आग लागल्यानंतर इमारतीतून लोक मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसले होते.
Maharashtra Gloves Manufacturing Factory Fire ( Marathi News ) छत्रपती संभाजीनगमधील एमआयडीसीमध्ये हातमोजे बनविणाऱ्या शनिवारी मध्यरात्री २ वाजता भीषण आग लागली. या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
या आगीने ३ वाजता रौद्र रूप धारण केले. यात १५ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, ६ कर्मचाऱ्यांना घाटी रुग्णालयात बेशुद्धावस्थेत हलविण्यात आले होते. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाळूज औद्योगिक वसाहतीमधील २१५-१६ सेक्टरमध्ये हँड ग्लोव्हज तयार करणारा सनशाईन इंटरप्राईज हा कारखाना आहे. यात २०० हून अधिक कर्मचारी काम करतात. शनिवारी मध्यरात्री रच्या सुमारास कंपनीत मोठा स्फोट झाला. काय झाले, हे कळायच्या आत कंपनीतून मोठ्या प्रमाणात धूर निघण्यास सुरुवात झाली. काही क्षणात कंपनीला आगीने वेढले.
वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्याला आग लागली असून कामगार अडकल्याचे स्थानिकांनी कळविले होते. आग लागल्यानंतर इमारतीतून लोक मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसले होते. कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, इमारतीत सहा कर्मचारी अडकले आहेत. भुल्ला शेख (65), कौसर शेख (26), इक्बाल शेख (26) आणि मगरूफ शेख (25) अशी अडकलेल्या चार कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, अग्निशमन विभागाचे वैभव बाकडे यांनी धाव घेतली. थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण १ वाजून २० मिनिटांनी कंपनीला आग लागल्याची माहिती मिळाली, अग्निशमन विभागाने धाव घेईपर्यंत कंपनीला चहूबाजूंनी आगीने वेढले होते. आग वाढेपर्यंत जवळपास १६ ते १८ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आग विझविण्याचे काम सुरु असल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी मोहन मुंगसे यांनी सांगितले.