छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर; स्टडीरूम उभारण्याचा मानस

By मुजीब देवणीकर | Published: March 31, 2023 02:14 PM2023-03-31T14:14:47+5:302023-03-31T14:16:24+5:30

जी-२० प्रमाणे शहर सौंदर्यीकरणासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation presented a budget of 3 thousand crores; Intention to set up a study room for competitive students | छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर; स्टडीरूम उभारण्याचा मानस

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर; स्टडीरूम उभारण्याचा मानस

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर:  महापालिका प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी आज दुपारी महापालिकेचा 2023-24 या आर्थिक वर्षाचा 3081 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. 

या अर्थसंकल्पात प्रत्येक वार्डातील विकास कामांसाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. जी-२० प्रमाणे शहर सौंदर्यीकरणासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली. महापालिका शाळांसाठी पहिल्यांदाच तब्बल 66 नवीन वर्ग खोल्या तयार करण्यासाठी तब्बल दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्याचा मानस महापालिकेने व्यक्त केला आहे. अग्निशमन विभाग सशक्त करण्यासाठी 25 कोटी, आरोग्य सेवेसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation presented a budget of 3 thousand crores; Intention to set up a study room for competitive students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.